'शाळा बंद पण फी भरा'; शिक्षण संस्थांनी लावला पालकांकडे तगादा!

School-Coronavirus
School-Coronavirus
Updated on

पुणे : शिक्षण विभागाने ऑनलाईन शाळेचे नियम, वेळपत्रक निश्चीत केले, त्यात पूर्व प्राथमिक आणि इयत्ता १ली, २री पर्यंत ऑनलाईन शिक्षण नसल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र, शिक्षण संस्थांनी या चिमुरड्यांच्या आईवडिलांना शुल्क भरा, गणवेश घ्या, पुस्तके घ्या म्हणून तगादा लावला आहे. मात्र, शिक्षणच नसेल तर शुल्क कसले? असा प्रश्न उपलब्ध पालकांनी उपस्थित केला असला तरी संस्थांनी शुल्क वसुलीचा ठेका अद्याप सोडलेला नाही.

'कोरोना'मुळे शैक्षणिक वर्षाचे वेळपत्रक कोलमडून पडले आहे. थेट शाळा सुरू करता येणार नसल्याने १५ जूनपासून अनेक ठिकाणी ऑनलाईन शाळा सुरू झाली आहे. यामध्ये इयत्ता दुसरी पर्यंत ऑनलाईन शिक्षण नाही, इयत्ता तिसरी ते पाचवी कमला एक तास, सहावी ते आठवी कमाल दोन तास तर, नऊवी ते बारावी पर्यंत कमाल तीन तास ऑनलाईन शिक्षण रोज द्यावे असे आदेशात नमूद केले आहे. 

पुण्यासारख्या तर रेडझोन मध्ये थेट शाळा तर पुढील काही महिने सुरू शक्य नाही, त्यामुळे अनेक शाळा ऑनलाईन शिक्षण देत आहेत. मात्र, पुर्व प्राथमिक आणि इयत्ता १ली व २रीची ऑनलाईन व ऑफलाईन अशी शाळा भरणार नसतानाही शाळांनी पालकांना शुल्क भरावे म्हणून मेसेज, ई-मेल प्राप्त झाले आहेत. तसेच काही शाळांनी तर थेट बँकेचे चलन पालकांच्या हातामध्ये दिले आहे. या तगाद्यामुळे पालक अस्वस्थ झाले आहेत. जेव्हा शाळा सुरू होतील, तेव्हापासूनची शुल्क आम्ही देऊ अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. 

'इपीटीए' वर दबाव वाढवला पाहिजे
आपल्या मुलांना त्रास होईल या भीतीने पालक शाळेच्या विरोधात जात नाहीत. पण शाळांचे पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये (इपीटीए) निश्चित होते. त्यामुळे इयत्ता पहिली व दुसरीच्या पालकांनी संघटीत होऊन 'इपीटीए'मध्ये शुल्क कमी करण्यासाठी दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच शिक्षण विभागाकडेही तक्रार करून शुल्क कमी करण्याची मागणी करणे गरजेचे आहे. 

"शाळेच्या शुल्क बाबत 'इपीटीए'मध्ये निर्णय केला जातो, शासनाने यासंदर्भात ८ मे रोजीच्या आदेशात याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. तर पूर्व प्राथमिकच्या शुल्काचा विषय महिला व बालकल्याण विभागाशी संबंधित आहे."
- विशाल सोलंकी, शिक्षण आयुक्त

"माझा मुलगा शिवाजीनगर येथील एका शाळेत ज्युनियर केजीला आहे, शाळेने २८ हजार रुपयांचे चलन भरण्यास सांगितले अाहे. पण शाळाच नसले तर पूर्ण वर्षाचे पैसे कसे काय द्यायचे?. जेव्हा शाळा सुरू होईल, तेव्हा पैसे भरू असे अनेक पालकांचे म्हणने आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."
- एक पालक

"मुलांना त्रास होईल म्हणून थेट पालक तक्रार करत नाहीत, पण अशा पालकांसाठी आम्ही उभे राहून, त्यांचे शुल्क कमी करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. 'इपीटीए'मध्ये शाळांनी ताळेबंद जाहीर केल्यास, त्यातूनही नेमकी शुल्क किती पाहिजे याबद्दल ही स्पष्टता येऊ शकते. 
- मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष, आप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.