नापास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! पास होण्याची संधी आलीय चालून

Exams
Exams
Updated on

पुणे : कोरोनामुळे इयत्ता ९वी आणि ११वीच्या अंतर्गत मूल्यांकनात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता त्यांची प्रत्यक्षात शाळेत बोलावून किंवा व्हिडिओ काॅन्फरन्सींगद्वारे तोंडी परीक्षा घेण्याचे आदेश बुधवारी (ता.२२) शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कोरोनामुळे परीक्षा होऊ शकली नव्हती, त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाद्वारे ९वी व ११वीतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करा, असे आदेश यापूर्वी शिक्षण विभागाने दिले होते. यानुसार अनेक संस्थांमध्ये विशेषतः महाविद्यालयांमध्ये ११वीतील शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. महाविद्यालयाने त्यांना १२वीतला प्रवेश नाकारला होता. पुण्यातील गरवारे महाविद्यालयात २०० विद्यार्थांना याचा फटका बसल्याचा प्रकार 'सकाळ'ने समोर आणला होता. अनेक पालकांनी  शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांना उशीरा का होईना दिलासा मिळाला आहे. 

शालेय शिक्षण विभागाने एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयाचा संदर्भ इयत्ता १० वीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी दिली जाते, तसेच २०१७-१८ मध्ये इ.९ वी मध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जून २०१८ मध्ये पुनर्परीक्षेची संधी देण्यात आली होती. त्याच धर्तीवर कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची फेरपरीक्षा घेणे शक्य होणार नाही. मात्र या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी इयत्ता ९ वी आणि इयत्ता ११ वी च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चालू वर्षात तोंडी पुनर्परीक्षेची संधी देण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी ७ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष बोलावून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधित शाळांनी तोंडी परीक्षा घेण्यात यावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()