10th Result : दहावीचा निकाल ऑनलाईन पाहताय ? गुणपत्रिका कधी मिळणार घ्या जाणून

राज्य मंडळातर्फे मार्च २०२३मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये आठ लाख ४४ हजार ११६ विद्यार्थी आणि सात लाख ३३ हजार ६७ विद्यार्थिनी आहेत.
10th result
10th resultesakal
Updated on

पुणे - बारावीच्या निकालानंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती ती दहावीच्या परीक्षेच्या निकालाची. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची-पालकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.२) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.

10th result
Mumbai: सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या चपलेवरून शोधली २ लाखांच्या मोबाईलची चोरी, पोलीस जोमात चोर कोमात

राज्य मंडळातर्फे मार्च २०२३मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये आठ लाख ४४ हजार ११६ विद्यार्थी आणि सात लाख ३३ हजार ६७ विद्यार्थिनी आहेत.

10th result
Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आता हेल्मेट आवश्‍यक

एकूण २३ हजार १० माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यात पाच हजार ३३ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित केली होती. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर होणार आहे.

10th result
SSC Result 2023: एका क्लिकवर पाहा तुमचा निकाल

सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावर उपलब्ध होतील आणि त्या माहितीची प्रत घेता येईल. राज्य मंडळाच्या ‘www.mahresult.nic.in’ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाची सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे. तर शाळांना ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

ऑनलाइन निकालानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ‘http://verification.mh-ssc.ac.in’ या अधिकृत संकेतस्थळावरून स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

10th result
Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आता हेल्मेट आवश्‍यक

परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीनुसार शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगतच्या दोनच संधी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहणार आहेत. पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ७ जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येतील. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक काढण्यात येईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.

10th result
Mumbai Crime News: महिलेने सहकाऱ्यांसोबत मिळून केली 14 कोटींची फसवणूक अन्...

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे -

- www.mahresult.nic.in

- http://sscresult.mkcl.org

- https://ssc.mahresults.org.in

10th result
Mumbai-Goa Highway : टोल वसुलीविरोधात ठाकरे गट आक्रमक; प्रशासनाला दिला थेट इशारा

गुणपडताळणी : ३ ते १२ जूनपर्यंत

छायाप्रत : ३ ते २२ जूनपर्यंत

जुलै-ऑगस्ट पुरवणी परीक्षा आणि श्रेणीसुधारसाठी अर्ज करणे : ७ जूनपासून

दहावीच्या गुणपत्रिकांचे वितरण : १४ जून (दुपारी ३ वाजता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.