मंचर :“भारतात मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश पडतो. ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. ऊर्जेचा सदुपयोग होण्यासाठी नवीन संकल्पना आमलात आणण्याची गरज आहे. तसेच प्रादेशिक भाषेच्या संवर्धनाची गरज व प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली या संस्थेची भूमिका यावर भर देईल.” असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे यांनी सांगितले.