Eid al-Fitr : रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण

दौंड शहरात रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण करण्यासह विविध उपक्रमांनी ईद साजरी केली जात आहे.
रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण
रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण sakal
Updated on

दौंड : दौंड शहरात रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण करण्यासह विविध उपक्रमांनी ईद साजरी केली जात आहे. दौंड शहरात रमजान ईद निमित्त भीमा नदीकाठी असलेल्या ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठणानंतर जामा मशिदीचे मौलाना मुबिन आत्तार यांनी धर्मसंदेश दिला. ते म्हणाले,

`` अल्लाह यांचे प्रेम सर्वांना लाभो. रमजानच्या काळात आणि दैनंदिन जीवनात आपणाकडून कळत - नकळतपणे ज्या चुका झाल्या आहेत त्यासाठी क्षमा मागतो. इतरांना त्यांच्या कृत्यांसाठी क्षमा करावे. जे अडचणीत आहेत त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात. जे कर्जात बुडाले आहेत त्यांना त्यातून बाहेर काढावे. प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांना अपेक्षित जीवनयापन करावे.

ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी पारंपरिक वेशात अबालवृध्द मोठया संख्येने उपस्थित होते. नमाज नंतर परस्परांना आलिंगन देत ` ईद - मुबारक ` म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, आदी या वेळी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

भीमा नदीकाठी असलेल्या दफनभूमीत जाऊन आप्तस्वकीयांच्या थडग्यांवर मुस्लिम बांधवांनी फुले वाहून प्रार्थना केली. रमजानच्या काळात जकात आणि फितरा (दानाचे प्रकार ) च्या रूपाने गरीब, गरजू कुटुंबाना धान्य, वस्त्र, रोख रक्कम, आदी दानधर्म करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.