Pune Eid-e-Milad News: पुण्यात ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारीच असणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत. राज्य शासनाने १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी १८ तारखेला करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ तारखेला अनंत चतुर्दशी असल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय. पण, पुण्यात १६ तारखेलाच ईद-ए-मिलादची सुट्टी असेल.
राज्य शासनाने १० नोव्हेंबर २०२३ च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली होती; ही सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज जारी केले आहेत. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.