Pune News : अमली पदार्थ रॅकेटमधील तपास प्रक्रियेची पुर्तता न केल्याने आठ आरोपींना जामीन मंजूर; ललीत पाटीलचा होता गुन्ह्यात समावेश

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात सात ऑक्टोबर २०२० ला २० किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले होते.
Mumbai High Court
Mumbai High Courtesakal
Updated on

पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आरोपी असलेल्या अमली पदार्थांच्या निर्मिती प्रकरणात उच्च न्यायालयाने आठ आरोपींना जामीन मंजूर केला आहे. अमली पदार्थ जप्त करण्याची कारवार्इ केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले अमली पदार्थांचे नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत सादर न केल्याने या गुन्ह्यात तपास प्रक्रियेची पुर्तता झाली नसल्याचे नमूद करत न्यायमुर्ती गौरी गोडसे यांनी हा आदेश दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.