Chakan Crime : विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीतील आठ जणांना अटक

चाकण औद्योगिक वसाहतीत तसेच महाळुंगे, चाकण परिसरात महावितरणने विद्युत रोहित्र उभारले आहेत. त्यातील तांब्याच्या तारा व पट्ट्या चोरीला जात होत्या.
Eight arrested who stole copper wires from electric motors chakan crime police
Eight arrested who stole copper wires from electric motors chakan crime police sakal
Updated on

चाकण : विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले असून त्या टोळी कडून ३४० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व पट्ट्या व पाच लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली चोरलेली वाहने एक कार व पाच दुचाकी असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "या प्रकरणी आरोपी रमेश उर्फ राहुल बाळू पडवळ(वय -27 वर्ष )सुनील उर्फ सैराट शिवाजी गावडे( वय -21वर्ष,दोघेही रा.निमगाव दावडी,ता. खेड, जि. पुणे )सुनील सुरेश गावडे (वय -23 वर्ष ),रवींद्र सुरेश गावडे (वय -23 वर्ष,दोघेही रा. खडकी पिंपळगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे )उस्मान बिलाल अब्दुल हरेरा (वय -20 वर्ष, रा.भांबोली ता. खेड )कार्तिक नामदेव पवार( वय- 25 वर्ष,रा.राक्षेवाडी ता. खेड )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चाकण औद्योगिक वसाहतीत तसेच महाळुंगे, चाकण परिसरात महावितरणने विद्युत रोहित्र उभारले आहेत. त्यातील तांब्याच्या तारा व पट्ट्या चोरीला जात होत्या. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतले.

Eight arrested who stole copper wires from electric motors chakan crime police
Chakan News : चाकणला वाहतूक विभागाची 'बेकायदा' रिक्षावर कारवाई

त्यांनी विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली. विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तार व पट्ट्या व रोहित्र खोलण्यासाठी वापरलेले साहित्य, गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. रमेश पडवळ याच्यावर नगर,पुणे जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात चोरीचे 16 गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुनील उर्फ सैराट शिवाजी गावडे याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.आरोपी निर्जन भागातील विद्युत रोहित्राचा डीओ चा खटका बंद करुन त्यानंतर ट्रान्सफॉर्मर बॉक्स विद्युत रोहित्र खाली पाडून थंड झाल्यानंतर त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेत होते.

Eight arrested who stole copper wires from electric motors chakan crime police
Chakan Traffic : चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; अतिक्रमणे काढण्याचे निर्देश

ही कारवाई पिंपरी- चिंचवड चे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,उपायुक्त संदीप डोईफोडे,डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते,

सहाय्यक निरीक्षक कल्याण घाडगे, पोलिस अंमलदार राजू कोणकेरी,युवराज बिराजदार, तानाजी गाडे,विठ्ठल वडेकर,अमोल बोराटे, प्रकाश चाफळे, किशोर सांगळे,संतोष काळे, गणेश गायकवाड,शिवाजी लोखंडे,संतोष वायकर,राजेंद्र खेडकर, अमोल माटे, मंगेश कदम, शरद खैरे, राजू जाधव यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.