अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड; मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना अटक

Eight MNS workers arrested for vandalizing Amazon office
Eight MNS workers arrested for vandalizing Amazon office
Updated on

पुणे :"नो मराठी नो अ‍ॅमेझॉन' या ऑनलाइन मोहिमेनंतर सुरू झालेल्या वादातून कोंढव्यात असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) आठ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांची एक दिवस पोलिस कोठडी रवानगी करण्यात आली आहे.

अमित अशोक जगताप (वय 40), सौरभ दीपक टिळेकर (वय 22), रोहित शाहू सोनावणे (वय 30), मयूर प्रकाश जगताप (वय 27) आकाश साधू आवटे (वय 24), अक्षय सुरेश जगताप (वय 25) मयूर शांताराम चव्हाण (वय 28) आणि निखिल शांताराम जगताप (वय 27, सर्व रा. कोंढवा बुद्रूक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अ‍ॅड. विजय ओंकारनाथ तेलंग (वय 43, रा. शंकरशेठ रस्ता) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

"नो मराठी नो अ‍ॅमेझॉन' ट्रेंडनंतर अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर मराठी भाषेला स्थान दिले जावे, अशी मागणी मनसेने केली होती. सुरवातीला अ‍ॅमेझॉनकडून मनसेच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे मनसेने मुंबईत अ‍ॅमेझॉनविरोधात जाहिरातीचे फलक लावले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील दिंडोशी न्यायालयाने नोटीसही बजावली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी अ‍ॅमेझॉनच्या कोंढवा येथील कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. आरोपींतर्फे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे आणि अ‍ॅड. रूपाली पाटील यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. पाटील करीत आहेत.
 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.