Dasara Melava: गर्दी वाढवण्यासाठी काय पण! शिंदेंच्या मेळाव्याला पुण्यातून निघाले परप्रांतीय

थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीतील मेळाव्याला सुरुवात होणार आहे.
Dasara Melava BKC
Dasara Melava BKC
Updated on

पुणे : पक्ष फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्यांची सध्या उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा सालाबादप्रमाणं शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसीमध्ये पार पडणार आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला ३ लाख लोक येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण ही गर्दी जमवण्यासाठी कोणालाही पकडून आणलं जात आहे. याचा प्रत्यय पुण्यात आला आहे. (Eknath Shinde Melava for increase crowd UP Bihari People left from Pune for BKC Mumbai)

Dasara Melava BKC
Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मेळाव्यानंतर गोंधळ; पोलिसांचा लाठीजार्ज

पुण्यातून बीकेसीकडं सकाळी एक बस निघाली होती या बसमध्ये काही लोक होते जे अमराठी आहेत. त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. हे लोक बहुतेक पुण्यात काम करणारे बिहारी कामगार आहेत. कारण त्यांच्याशी सामच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी मुंबईला जाणाऱ्या बसमध्ये बसण्यास आपल्याला सांगितल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीनं आपण मुंबईला फिरायला चाललो असल्याचं उत्तर दिलं आहे.

Dasara Melava BKC
Pankaja Munde: हकीकत को तलाश..., जरुरत से जादा इमानदार...; शायरींमधून व्यक्त झाली खदखद

बसमधील एका परप्रांतीय व्यक्तीनं सांगितलं की, एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी आम्ही निघालो आहोत. यावरुन केवळ एकाच व्यक्तीला आपण कुठे चाललो आहोत हे माहिती होतं, पण उरलेल्या इतर जणांना आपण कुठे चाललो आहोत हे माहिती नव्हतं, आम्हाला फक्त मुंबईला नेण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Dasara Melava BKC
पंकजा मुंडेंनी पुढच्यावेळी शासकीय हेलिकॉप्टरनं मेळाव्याला यावं; जानकरांनी व्यक्त केली अपेक्षा

यावरुन एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला गर्दीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरुन माणसं आणली गेली आहेत हे स्पष्ट झालं आहे. दोन दिवसांपासून शिंदेंच्या मेळाव्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला गेला असल्याचंही विविध बातम्यांमधून समोर आलं आहे. त्यासाठी जेवण-नाश्त्याच्या ऑर्डर्स, बस, रेल्वेच्या बुकिंग असं सर्वकाही करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.