Eknath Shinde : शिवतारे उद्याच्या पुरंदरचे किल्लेदार असतील ,शिंदे ; ‘महायुती’तर्फे सासवडमध्ये जनसंवाद सभा

अजित पवार आणि विजय शिवतारे बरोबर असल्यामुळे दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मतदारसंघात मिळालेच पाहिजे. शिवतारे यांचे खरे रूप आज पाहायला मिळाले. शिवतारे उद्याच्या पुरंदरचे किल्लेदार असतील,’’
Eknath Shinde
Eknath Shinde sakal
Updated on

सासवड : ‘‘अजित पवार आणि विजय शिवतारे बरोबर असल्यामुळे दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मतदारसंघात मिळालेच पाहिजे. शिवतारे यांचे खरे रूप आज पाहायला मिळाले. शिवतारे उद्याच्या पुरंदरचे किल्लेदार असतील,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

सासवड (ता. पुरंदर) येथील पालखी तळावर महायुतीतर्फे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शिंदे बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार अशोक टेकवडे आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘‘ही सभा टर्निंग पॉइंट ठरणार असून विजयाची सभा आहे.

विमानतळाचा प्रकल्प पुढे नेताना लोकांना विश्‍वासात घेतले जाईल.’’ पवार म्हणाले, ‘‘ही निवडणूक भावकी किंवा बाजार समितीची नाही; तर देशाची आहे. पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी व विकासकामे करण्यासाठी ही निवडणूक आहे. मागील खासदारापेक्षा चांगले काम पुढचा खासदार करेल.

लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुनेत्रा पवार करतील. वीर धरणांमधून विसर्ग होणारे पाणी पुरंदरमध्ये आणून नाझरे धरण भरण्याचा संकल्पही आमचा आहे. पुरंदरमधील दिवे येथे आयटीआय पार्क; तर सासवडपर्यंत मेट्रो आणण्यासाठी सत्ताधारी पक्ष काम करेल.’’

Eknath Shinde
Pune Leopard News : पालकांच्या कुशीतील बालिकेला बिबट्याने पळवले

शिवतारे म्हणाले, ‘‘विमानतळ, गुंजवणी, पुरंदरमध्ये आयटी पार्क झाले; तर एक लाख जणांना नोकऱ्या मिळतील. फुरसुंगीतील सर्व वाड्या-वस्त्यांवर पाणी दिले पाहिजे. पुरंदर उपसा नीट चालली पाहिजे. अजित पवारांनी ५६ कोटींचा निधी दिल्यामुळे आता ही योजना व्यवस्थित चालेल. कऱ्हा नदीत पाणी सोडल्यास बारामतीमधील गावांनाही बारमाही पाणी मिळेल.

पुणे-दौंड लोकलबाबत विचार व्हावा. लोकसभा मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मी तह केला.’’ अतुल म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश जगताप यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.