बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध होणार

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध निवडणूकीचा मार्ग आज मोकळा झाला.
Baramati taluka co-operative buying and selling team
Baramati taluka co-operative buying and selling teamsakal
Updated on
Summary

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध निवडणूकीचा मार्ग आज मोकळा झाला.

बारामती - येथील बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध निवडणूकीचा मार्ग आज मोकळा झाला. संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 17 जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे.

मात्र या बाबतची अधिकृत घोषणा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर केली जाणार आहे, सोमवारी अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली.

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानून 17 उमेदवारांनी 17 जागांसाठी अर्ज दाखल केल्यामुळे परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

यंदा बारामती तालुका खरेदी विक्री संघावर या पूर्वी काम केलेले पाच तर प्रथच संघावर काम करणारे बारा नवीन चेहरे अजित पवार यांनी दिले आहेत. नव्या जुन्यांचा मेळ घालण्याचेच काम पवार यांनी या निमित्ताने केले असल्याची माहिती बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.

यंदा संचालक मंडळात सभासद संस्था प्रतिनिधींमध्ये विक्रम आनंदराव भोसले (वाणेवाडी), बाबुराव तात्याबा चव्हाण (घाडगेवाडी), दत्तात्रय रामभाऊ आवाळे (सावळ), विजय रामचंद्र शिंदे (बांदलवाडी), रवींद्र महादेवराव माने (खांडज), शिवाजी जगदेवराव टेंगले (म्हसोबावाडी), संभाजी दादासाहेब जगताप (पणदरे), उदयसिंह पंढरीनाथ धुमाळ (धुमाळवाडी), नितीन रामचंद्र देवकाते (पिंपळी), लक्ष्मण वसंत जगताप (जळगाव सुपे) यांना, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब चंद्रराव मोरे (अंजनगाव) यांना, इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून ज्ञानदेव बापूराव नाळे (डोर्लेवाडी) यांना, महिला प्रतिनिधी म्हणून सोनाली दादासो जायपत्रे (मुढाळे) व लताबाई अंकुश जगताप (सायंबाचीवाडी) यांना भटक्या जाती विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्ग प्रतिनिधी म्हणून रमेश शिवाजी देवकाते (मेखळी) तर वैयक्तिक सभासद प्रतिनिधी म्हणून भारत गुलाबराव ढवाण (बारामती) व अशोक लालासाहेब जगताप (पणदरे) यांना संधी देण्यात आली आहे.

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना 1963 मध्ये झाली. या संस्थेची उलाढाल आज 117 कोटी रुपये असून संस्थेच्या विविध दुकानांच्या 22 शाखा कार्यरत आहेत. औषधे, बी बियाणे, खते, रासायनिक औषधांचा व्यापार संघाच्या वतीने केला जातो. संघामध्ये 126 कर्मचारी कार्यरत असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही संस्था महत्त्वाची आहे. बारामती तालुक्यातील एक प्रमुख सहकारी संस्था म्हणून खरेदी विक्री संघाकडे पाहिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.