महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद सरचिटणीस पदी काकासाहेब पवार यांची निवड

दक्षिण पुणे नागरिकांच्या वतीने सत्कार
Election of Kakasaheb Pawar as General Secretary of Maharashtra Kustigir Parishad
Election of Kakasaheb Pawar as General Secretary of Maharashtra Kustigir Parishad
Updated on

आंबेगाव - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी नुकतीच जाहिर झाली. या कार्यकारिणीमध्ये आंबेगाव येथील अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन पुरस्कार प्राप्त पै. काकासाहेब पवार यांची सरचिटणीस पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शवशंभू प्रतिष्ठान जांभूळवाडी आणि युवा संवाद सामाजिक संस्थेकडुन सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची झालेली निवड ही बिनविरोध झाली.यामध्ये,विदर्भाचे रामदास तडस यांची निवड झाली आहे.

विदर्भाला अध्यक्ष पद, मराठवाड्याला सरचिटणीस तर पश्चिम महाराष्ट्राला वरिष्ठ उपाध्यक्ष पद या निवडीमध्ये देण्यात आले. यावेळी नवर्वाचित कार्यकारिणीतील सदस्यांनी एकोप्याने काम करण्याचे ठरविले आहे.तर महाराष्ट्राला मागील काही दिवसांपासून पैलवानकीला गळती लागली होती ती कुठेतरी पूर्ण करण्याचे काम आम्ही सगळे करणार आहोत. तर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुस्तीगीर परिषदेवर असताना चांगली कामगिरी केली होती. बऱ्याच पैलवानांना मोठी मदतही पवार साहेबांनी केली होती.त्यांनी आमच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. जागतिक कुस्तीसाठी पैलवान तयार होतील असे प्रयत्न आम्ही करणार आहोत.अशी माहिती पै. काकासाहेब पवार यांनी सकाळशी बोलताना दिली.

यावेळी, शवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितिन जांभळे पाटील, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड,पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे सरचिटणीस राहुल बेलदरे पाटील,दीपयंती चिकणे, संजय पिरंगुटे,पत्रकार जयदीप निंबाळकर आदी मान्यवरांसह दक्षिण पुणे परिसरातील नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()