'सायकलींचं नाही, इलेक्ट्रिक बाईकचं शहर' अशी मिळणार पुण्याला नवी ओळख; काय आहे कारण?

Electric_Bike
Electric_Bike
Updated on

पुणे : पुणे शहरामधील वाढते प्रदुषण आणि वाढती वाहतुककोंडी कमी करण्यासाठी व्हि-ट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीने पुढाकार घेतला आहे. या कंपनीच्या माध्यमातून ग्रीन पुणे अंतर्गत 'इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट' ही संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेचा एक भाग म्हणून 'इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट'ला शहर सुधारणा समितीने शुक्रवारी (ता.२६) मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

या प्रकल्पाअंतर्गत इलेक्ट्रिक बाईकने प्रवास करण्यास पुणेकरांना कमीत कमी 90 पैसे प्रति किलोमीटर ते जास्तीत जास्त चार रुपये प्रति किलोमीटर खर्च येणार आहे. एका ठिकाणी १० इलेक्ट्रिक बाईक चार्ज होतील असे एक चार्जिंग स्टेशन मुख्य रस्त्यावर उभारण्यात येणार आहे. अशा प्रकारे पुणे शहराच्या विविध भागांमध्ये मुख्य रस्त्यांवर 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास पुणे शहर सुधारणा समितीने मान्यताही दिली आहे.

भविष्यात पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार असून एकूणच शहरातील वाहतुककोंडी, प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी पुणे मनपाला कोणतीही आर्थिक गुंतवणूक करावी लागणार नाही. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी आणि पुणे मेट्रोचे सहकार्य मिळणार आहे, अशी माहिती पुणे शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()