विद्युत दाहिनी बंद असल्याने अखेरचा प्रवासही खडतर

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील धोबीघाट येथील मुक्तिधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी मागिल दोन महिन्यांपासून बंद आहे.
electric crematorium
electric crematoriumsakal
Updated on
Summary

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील धोबीघाट येथील मुक्तिधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी मागिल दोन महिन्यांपासून बंद आहे.

कॅन्टोन्मेंट - पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील धोबीघाट येथील मुक्तिधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी मागिल दोन महिन्यांपासून बंद आहे. कर्मचाऱ्यांचा अभाव आणि विद्युत दाहिनी बंद असल्याने मानवाचा अखेरचा प्रवासही खडतर झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मागिल आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे लाकडे ओलसर झाली असून, शव पूर्णपणे जळत नसल्याने नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. अर्धवट जळालेले शव मोकाट कुत्र्यांनी बाहेर काढले तर, त्याला जबाबदार कोण असाही सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

येथील कामगार व सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकल्याने स्मशानभूमीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अभियंता विजय चव्हाण म्हणाले की, येथील विद्युत दाहिनी २० वर्षे जुनी झाली आहे. कोरोनाकाळात या विद्युत दाहिनीवर अधिक लोड वाढला होता. पूर्वीची एकच विद्युत दाहिनी असून, काही तांत्रिक अडचणी येत आहेत. लवकरच दोन नव्याने (फर्नेस) भट्टी उभारण्यात येणार आहेत. विद्युत दाहिनी ऐवजी गॅस दाहिनी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सव्वा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नव्याने टेंडर काढण्यात आले असून, दोन महिन्यात येथील काम पूर्ण करण्यात येईल. कंत्राटी पद्धतीने कामगार कार्यरत होते, त्यांचे कंत्राट संपले आहे. बोर्डाकडून विशेष कामगारांची नियुक्ती केली जात नाही. बोर्डातील आरोग्य कर्मचारी तेथे स्वच्छतेचे काम करतात. तसेच सुरक्षा रक्षक ही कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.