Electricity Bill: अजब कारभार! वीजेचा मीटर खराब आहे म्हणून गेला अन् महावितरणने सोपवले दीड लाखाचे वीज बिल
कोळवण: होतले (ता. मुळशी) येथील प्रकाश बाबू कडू या ग्राहकास महावितरणने दीड लाखाचे वीज बील दिले आहे. वीजेचा मीटर खराब आहे व तो बदलून मिळावा असा अर्ज संबंधित वीजग्राहक प्रकाश कडू यांनी महावितरणकडे ११ ऑगस्ट २०१७ रोजी केले होते. परंतु सहा वर्ष झाले तरीही या अर्जाची दखल तर घेतली गेली नाही. उलट जुलै महिन्यात १,४९,८४० रुपयांचे वीज बील दिले.
यावर संबंधित वीज ग्राहकाने सांगितले की आमचे कुटुंब पुणे येथे स्थायिक आहे. घरी महिन्यातून काही दिवसच शेतीच्या कामानिमित्त येणे-जाणे होते. मीटर खराब असून तो बदलून द्या अशी मागणी करून सुद्धा तो बदलला गेला नाहीच उलट दीड लाखाचे वीजबिल पाठवले गेले.
संबंधित वीज बिल महावितरणने कमी करून २०,५०० करून दिले. परंतु आमचा वीज वापरच नाही आणि वीज मीटर सुद्धा महावितरणने काढला आहे आता वीजबिल भरा असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे प्रकाश कडू यांनी सांगितले.
याबाबत महावितरणचे तालुका उपअभियंता आनंद घुले यांनी सांगितले की "मी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून संबंधित ग्राहकाच्या वीज देयकाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल".
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.