पुणे : महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर असा दर्जा मिळाला असला तरी अनेकांनी लस घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या ११ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील ९ जणांनी लस घेतली नव्हती. तर एक डोस घेतलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.(Eleven employees of Pune Municipal Corporation died due to corona)
महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासून पुण्यात कोरोनाची साथ सुरू झाली. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी फ्रंटलाइन कर्मचारी असल्याने त्यांनी त्वरित लस घेणे आवश्यक होते; पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी मार्च महिन्याच्या अखेरीस कर्मचाऱ्यांसाठी तातडीने लसीकरण करून घ्यावे, अन्यथा कोरोनाबाधित झाल्यास महापालिकेकडून दिले जाणारे सर्व फायदे बंद केले जातील, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास टाळाटाळ केली आहे.
मार्चमधील बाधित - १२७
मृत्यू - १
मे महिन्यातील मृत्यू - १०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.