पात्र टेंडर केले अपात्र, उपायुक्तांनी चौकशीसाठी मागवल्या फाईल

घोटाळा केल्याच्या आरोपाखाली संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा
पुणे महापालिका
पुणे महापालिकाsakal
Updated on

शिवाजीनगर : प्रभाग दहा मधील विविध ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकणे,पदपथ दूरूस्ती करणे, सांस्कृतिक कार्यालयाचे काम करणे, रस्ता काँक्रीट करणे इत्यादी कामासाठी उपायुक्त परिमंडळ दोन यांच्याकडून नऊ निविदा (टेंडर) काढण्यात आले होते. यामध्ये नऊ निवीदा उपायुक्त यांनी पात्र ठरवल्या होत्या. परंतू , ई-टेंडर पास करत असताना पात्र च्या समोर अपात्र असे लिहून घोटाळा केल्याच्या आरोपाखाली संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, त्यांची चौकशी करावी अशी मागणी डेक्कन पोलिस ठाणे येथे ठेकेदार सुनील चव्हाण यांनी केली आहे.

पुणे महापालिका
मंदीरांसह ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हायला हवे- डॉ. राहुल देशपांडे

पात्र निवीदा अपात्र कशा काय झाल्या? या संदर्भात उपायुक्त नितीन उदास परिमंडळ दोन यांनी फायली मागून चौकशी करत असल्याचे सांगितले.

"संबंधित तक्रारदाराने दिलेली कागदपत्रे पाहून, चौकशी केली जाईल आणि त्यानंतर कारवाई करण्यात येईल". - मुरलीधर करपे, पोलिस निरीक्षक डेक्कन पोलिस ठाणे

"माझ्यावर अन्याय झाला आहे, निवीदा सेल कर्मचाऱ्यांनी परस्पर अपात्र केले आहे, त्यांची चौकशी करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी डेक्कन पोलिस ठाण्यात मी केली आहे. - सुनील चव्हाण, ठेकेदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.