Pune News : महापालिकेतील लिफ्टमध्ये दोन तास अडकला कर्मचारी

पुणे महापालिकेच्या लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असताना लिफ्ट बंद पडून आरोग्य विभागातील कर्मचारी दोन तास आतमध्येच अडकून पडला.
Lift
Liftsakal
Updated on

पुणे - महापालिकेच्या लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असताना लिफ्ट बंद पडून आरोग्य विभागातील कर्मचारी दोन तास आतमध्येच अडकून पडला. अखेर अग्निशामक दलाच्या मदतीने या कर्मचाऱ्यास बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार आज (ता. १७) घडला. त्यामुळे ठेकेदाराकडून केल्या जाणाऱ्या कामाबद्दल प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

महापालिका भवनातील जुन्या इमारतीमध्ये चार लिफ्ट आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे १० लाख रुपयांचा खर्च केला जातो. त्यामध्ये लिफ्ट बंद पडू नये, बंद पडल्यास तातडीने दार उघडता यावे यासाठी यंत्रणा सुरु असणे आवश्‍यक आहे.

आज सायंकाळी पाच वाजता आरोग्य विभागातील एक कर्मचारी लिफ्टने जात असताना ही दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या मध्ये लिफ्ट बंद पडली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने त्यांच्या सहकाऱ्यास फोन करून याची माहिती दिली. विद्युत विभागाच्या उपअभियंत्यास ही माहिती मिळताच त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी लिफ्टच्या बॉक्सची चावी तुटल्याने लिफ्ट सुरु करता आली नाही. अखेर अग्निशामक दलाला याची माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी अवजारांचा वापर करून दार उघडून कर्मचाऱ्यास बाहेर काढले.

विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल म्हणाले, ‘ठेकेदाराने व संबंधित उपअभियंत्यांनी लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. आज घडलेला प्रकार गंभीर आहे. त्यामुळे यासंदर्भात नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.