स्वायत्ततेतून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, द्वीवीद पदवी अभ्यासक्रम आदी सुरू केले जाणार
garware
garwaresakal
Updated on

पुणे - विद्यापीठ अनुदान आयोगाने गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सला शैक्षणिक स्वायतत्ता प्रदान केली असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही त्याला मान्यता दिली आहे. या माध्यमातून महाविद्यालयात कालससुंगत रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती राबवली जाणार आहे. त्याचबरोबर आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, द्वीवीद पदवी अभ्यासक्रम आदी सुरू केले जाणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गीता आचार्य यांनी दिली.

garware
तालिबानीच्या कचाट्यातून सुटलेला मराठी माणूस;पाहा व्हिडिओ

महाविद्यालयाला २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्ता मिळाली आहे. या निमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. आचार्य यांनी विविध योजनांची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, उपप्राचार्य डॉ. आनंद लेले, डॉ. केतकी मोडक, प्रा. विनय चाटी आदी उपस्थित होते.

garware
व्यवसाय बदला तरी भटकंती चालूच;पाहा व्हिडिओ

डॉ. आचार्य म्हणाल्या, "महाविद्यालयातील बीबीए, बीबीए इन आयबी, बीबीए इन सीए या अभ्यासक्रमांना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठात शिक्षण घेउन, ड्युएल डिग्री घेण्याची संधी मिळणार आहे. यासाठी हल विद्यापीठाशी करार केला आहे. चार वर्षाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना ड्युएल डिग्रीचे मिळवता येणार आहे." बीबीए आयबीची वाढीव तुकडीची योजना असून, कॉर्पोरेट प्रशिक्षणासाठी सहकार्य करार येत्या काळात महाविद्यालय करणार आहे. विद्यार्थ्यांच्या सामाजिक किंवा कॉर्पोरेट इंटर्नशिप किंवा स्टार्टअपसाठी, तसेच मूल्यवर्धित अभ्यासक्रमांसाठी क्रेडीटची तरतूदही करण्यात आल्याचे डॉ. आचार्य यांनी सांगितले.

चिपळूणला उपकेंद्र

महाविद्यालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने चिपळून येथे उपकेंद्र (सॅटेलाइट सेंटर) सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. कोकणातील विशेष करून चिपळूणमधील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित नवे अभ्यासक्रम याद्वारे शिकता येणार आहे. विद्यापीठाची मान्यता मिळाली की केंद्र सूरू होईल, असे व्हनकटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()