TC College : बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास एम्पावर्ड ऑटोनॉमस कॉलेज दर्जा प्रदान

अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर व सचिव मिलिंद वाघोलीकर यांनी याबाबत माहिती दिली
TC College
TC Collegeesakal
Updated on

बारामती : येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (एम्पावर्ड ऑटोनॉमस कॉलेज स्टेटस) दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

TC College
Nashik News : इगतपुरीत 24 तासांत 100 मिमिपेक्षा जास्त पाऊस! धुक्यामुळे वर्दळीचा मुंबई-आग्रा महामार्ग मंदावला

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या अधीन राहून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ स्वायत्त महाविद्यालय व मान्यता प्राप्त परिसंस्था यांना अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्याबाबतची मानके, यामधील तरतुदींच्या आधारे, तसेच विद्यापीठ अनुदान आयोग संबंधित शिखर संस्था व केंद्र व राज्य सरकार तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्याकडून निर्गमित केलेल्या नियमानुसार 2024-25 ते 2033-2034 या पुढील दहा वर्षांकरिता हा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर व सचिव मिलिंद वाघोलीकर यांनी याबाबत माहिती दिली.

TC College
Nandurbar Agriculture News: स्ट्रॉबेरी, सफरचंदापाठोपाठ सातपुड्यात ड्रॅगन फ्रुटची शेती; कोरडवाहू जमिनीत यशस्वी प्रयोग

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी जून 1962 मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या महाविद्यालयात सध्या 12000 विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर वर्गांमध्ये शिक्षण घेत आहे. महाविद्यालयास धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झाला असून नॅक ए प्लस दर्जा देखील प्राप्त झाला आहे. डिसेंबर 2018 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयास स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व विषयांचे अभ्यासक्रम तयार करून, परीक्षांचे नियोजन, निकाल महाविद्यालय स्तरावर करीत आहे.

या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे रशिया, उझबेकिस्तान तसेच आसाम येथील विद्यापीठ व संशोधन संस्थांबरोबर आंतरराष्ट्रीय करार झाले असून विविध आघाड्यांवर महाविद्यालय यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. महाविद्यालयात 11 संशोधन केंद्र असून 51 मार्गदर्शक प्राध्यापकांचे 140 विद्यार्थी पीएच. डी. करीत आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी दिली. महाविद्यालयास अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर व सचिव मिलिंद वाघोलीकर यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com