माळेगाव : शेतीसह कुक्कुटपालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसायात विशेषतः महिला उत्कृष्ट काम व कष्ठ करतात. त्या आपले कुटुंब अर्थिक दृष्ट्या सावरण्यास हातभार लावतात. त्यामुळे सगळ्या बहिणींमध्ये `शेतकरी बहिणी ` जास्त लाडक्या आसाव्यात, तसे झाल्यास महिला मोठ्या उत्साहाने उद्योग व्यवसायात पुढे येतील, असे आवाहन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट-बारामती च्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांनी केले.