- प्रकाश शेलार
खुटबाव - एकेकाळी देलवडी (ता. दौंड) हे गाव मजुरी कामासाठी प्रसिद्ध होते. मजुरी कामातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे देलवडीकरांनी ओळखले आणि १९६९ मध्ये गावामध्ये सूर्यकांत नाईक हे गृहस्थ पहिले अभियंता झाले. त्यांचीच प्रेरणा घेत अनेक युवक अभियंते बनले. देलवडीत आज १८९ अभियंते आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये १ अभियंता असल्याने पुणे जिल्ह्यामध्ये अभियंत्याचे गाव म्हणून देलवडीचा नावलौकिक आहे.