Vidhan sabha 2019 : हडपसरमध्ये स्वीप उपक्रमांतर्गत मतदारांचे प्रबोधन

Enlightenment of voters under Sweep initiative in Hadapsar.jpg
Enlightenment of voters under Sweep initiative in Hadapsar.jpg
Updated on

Vidhan sabha 2019 :  मांजरी : विधानसभा निवडणूकीसाठी अधिकाधिक नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा व मतदानाची टक्केवारी वाढवी यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत मतदारांचे प्रबोधन करण्यात येत आहे. हडपसर येथील आदित्यनगर गृहनिर्माण सोसायटीच्या महिलांनी त्याबाबतची निवडणूक आयोगाची माहिती पत्रके परिसरात वाटून मतदारांमध्ये जागृती निर्माण केली.

शहरातील विविध भागात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदारांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदित्यनगर सोसायटीचे महिलामंडळातील सर्व सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, जिल्हा स्वीप समन्वयक अनिल पवार, यशवंत मानखेडकर, आशाराणी पाटील आणि आदित्यनगर गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती केली जात आहे. 

शहरातील बसथांबे, भाजी मंडई, मोठे चौक, शैक्षणिक संस्था, गर्दीच्या ठिकाणी प्राब संस्थेकडून ही माहिती पत्रके देऊन जनजागृती केली जात आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.