बालेवाडी (पुणे) : वटपौर्णिमा म्हणजे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. जन्मोजन्मी हाच पती मिळण्यासाठी महिला हे व्रत करतात. या प्रथे प्रमाणे बाणेर येथील महिलांनी वट पौर्णिमा साजरी केली. बाणेर गावठाणात एक मोठा वटवृक्ष होता, तो मागच्या वर्षी मुळासहीत उन्मळून पडला, त्याच जागी ग्रामस्थांनी नवीन रोपटे लावून यावर्षीही महिलांनी वर्षानुवर्ष या ठिकाणी वटपौर्णिमा साजरी केली. त्यात खंड पडला नाही. सगळीकडे कोरोनाचे सावट असतानाही घराजवळील वडाची पूजा करायला महिलांनी प्राधान्य दिले. त्याचबरोबर जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच आपण निसर्गाचे संगोपन आणि संवर्धन करा असे उपदेश सगळ्यांना करतो. या झाडांचे पुनर्रोपण केल्यामुळे बाणेरकरांनी जागतिक पर्यावरण दिन ही साजरा केलेला आहे.
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस म्हणजे वटसावित्रीची पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हे व्रत केल्यास पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी महिलांची धारणा आहे. हे व्रत केल्यामुळे पती वरील संकटे दूर जातात व पतीला दीर्घायुष्य लागते असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. असे म्हटले जाते की याच झाडाखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजा कडून परत मिळवले. बाणेर गावठाणात शंभर वर्षांपूर्वीचा एक मोठा वटवृक्ष होता या झाडाखाली पूर्वी चावडी भरायची. त्याचबरोबर समस्त गावातील महिला या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करायच्या. मात्र गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा वृक्ष मुळापासून उन्मळून पडला, त्याच जागी बाणेर येथील ग्रामस्थांनी एक वडाचे छोटे रोपटे याठिकाणी लावल्यामुळे या वर्षीही महिलांनी आनंदाने एकत्र जमत वटपौर्णिमा साजरी केली.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
आज सगळीकडे कोरोनाचे संकट असले तरी महिलांनी आपल्या घराजवळील या वडाची पूजा करण्याला प्राधान्य दिले. अगदी नटून थटून काठापदराच्या साड्या नेसून महिलानी एकमेकींना हळदीकुंकवाचे सुवासनिंचे वाण देत हा सण साजरा केला. त्यातच आज जागतिक पर्यावरण दिन. आपण निसर्गाचे संगोपन करा, संवर्धन करा असा म्हणतो. त्याचप्रमाणे हा हेतू या झाडाच्या किंवा झाडांचे पुनर्रोपण करून बाणेरकरांनी साध्य केला आहे असे म्हणावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.