Crime News : सिंहगडावर कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी आणलेली उपकरणे चोरीला

नेहमी दुर्गप्रेमी, पर्यटक यांनी गजबजलेल्या सिंहगडावर धक्कादायक घटना घडली असून, कचरा प्रकल्पासाठी बसविण्यात आलेली तब्बल साडेसात लाख रुपयांची उपकरणे आज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली.
waste treatment plant
waste treatment plantsakal
Updated on
Summary

नेहमी दुर्गप्रेमी, पर्यटक यांनी गजबजलेल्या सिंहगडावर धक्कादायक घटना घडली असून, कचरा प्रकल्पासाठी बसविण्यात आलेली तब्बल साडेसात लाख रुपयांची उपकरणे आज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली.

सिंहगड - नेहमी दुर्गप्रेमी, पर्यटक यांनी गजबजलेल्या सिंहगडावर धक्कादायक घटना घडली असून, कचरा प्रकल्पासाठी बसविण्यात आलेली तब्बल साडेसात लाख रुपयांची उपकरणे आज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहेत. एवढी मोठी चोरीची घटना घडल्याने गडाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात वन विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगडावरील गाडीतळावर पश्चिम बाजूस वन विभागाच्या माध्यमातून कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचे काम सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यापासून त्यासाठी लागणारी उपकरणे व इतर साहित्य बसविण्याचे काम सुरू आहे. ओला कचरा,सुका कचरा व प्लास्टिक कचरा अशा तिन्ही प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे बसविण्यात आली होती.

दि. 22 डिसेंबर रोजी वन विभागाचे अधिकारी संबंधित कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी गेले असता तेथील उपकरणे, मोटार व इतर साहित्य असा तब्बल साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञातांनी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी.पी. शिंदे पुढील तपास करीत आहेत.

गडाची सुरक्षा रामभरोसे -

सिंहगडावर रात्रीच्या वेळी अनेक जण ये-जा करत असल्याचे 'सकाळ'ने वन विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर रात्रपाळीसाठी गोळेवाडी तपासणी नाक्यावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत. परंतु कोंढणपूरमार्गे येणाऱ्या वाहणांवर रात्रीच्या वेळी नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी गाडीतळ किंवा गडावर सुरक्षा कर्मचारी तैनात नसल्याने गडाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे -

सिंहगडार येणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने किंवा पोलीस प्रशासनाने कर्मचारी तैनात केलेले नाहीत. त्यामुळे उपद्रव शुल्काच्या नावाखाली लाखो रुपये गोळा करणाऱ्या वन विभागाने गडाच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण परिसरात अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी तैनात असणेही आवश्यक बनले आहे.

कोंढणपूर फाट्यावरील तपासणी नाका सुरु होणे गरजेचे -

गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावरुन अनेक नागरिक कोंढणपूरला जायचे आहे असे सांगून पुढे जातात. पुढे ते खरंच कोंढणपूरला जातात की गडावर जातात हे पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी कोणीही नसते. वन विभागाने त्यासाठी कोंढणपूर फाट्याजवळ सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमस्वरूपी तपासणी नाका सुरु करण्याचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी एक तयार कंटेनर खोलीही बसविण्यात आलेली आहे मात्र गेट व इतर कामे रेंगाळलेली दिसत आहेत. रात्रीच्या वेळी गडावर ये-जा करणारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर तपासणी नाका तातडीने सुरू होणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()