E-rights System : तलाठ्यांकडील हेलपाटे टळणार; ई-हक्क प्रणालीद्वारे करा अर्ज दाखल

सध्या फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. परंतु आता तलाठ्याकडे न जाता अर्ज दाखल करण्यासाठी राज्य सरकारने ई- हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
Online Satbara
Online Satbarasakal
Updated on

पुणे - सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसह इतर महत्त्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ‘ई-हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर दाखल अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येतील आणि त्या त्रुटींची पूर्तताही तेथेच करता येईल.

दोन कोटींहून अधिक फेरफार नोंदी

सध्या फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. परंतु आता तलाठ्याकडे न जाता अर्ज दाखल करण्यासाठी राज्य सरकारने ई- हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून दोन कोटींहून अधिक ऑनलाइन फेरफार नोंदविले आहेत. तर फेरफारपैकी केवळ साडेसव्वीस लाख नोंदी या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे झाल्या आहेत.

असा करा अर्ज

  • अर्जदार संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतो आणि तलाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया करू शकतात.

  • वारसाची नोंद करण्यासाठी किंवा मयताचे नाव कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही.

  • संकेतस्थळाला भेट देऊन तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून फेरफार अर्जाची माहिती भरल्यानंतर हा अर्ज तलाठ्याच्या लॉगिनमध्ये दिसणार.

  • संबंधित अर्ज मंजूर करून तलाठी फेरफार नोंद करणार.

एसएमएसद्वारे मिळणार माहिती

एखाद्या अर्जदाराने फेरफारसाठी अर्ज दाखल केला आणि तो स्वीकृत झाला तर त्याचा एसएमएस अर्जदाराला येणार. त्यामध्ये फेरफारचा क्रमांक नमूद असेल. जर अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर त्रुटी पूर्ततेसाठी अर्ज परत केल्याची माहिती एसएमएसद्वारे अर्जदाराने मिळेल. त्यामुळे हे संकेतस्थळ नुसतेच अर्ज दाखल करण्याचे माध्यम नसून यामध्ये अर्जाची प्रगती एसएमएसद्वारे मिळणार. राज्य सरकारने अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासाठी ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सातबाऱ्यावरती दुरुस्त्या करायचे आहेत, त्यांनी वापरावी.

- सरिता नरके, राज्य संचालक, माहिती तंत्रज्ञान कक्ष, महसूल विभाग

नऊ प्रकारचे फेरफार ऑनलाईन

१) वारसाची नोंद करणे

२) मयताचे नाव कमी करणे

३) कर्जाचा बोजा चढविणे

४) कर्जाचा बोजा कमी करणे

५) ई-करार नोंदणी करणे

६) विश्वस्तांचे नाव बदलणे

७) अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे

८) एकत्र कुटुंब कर्त्याची नोंद कमी करणे

९) सातबारा उताऱ्यावरील चुका दुरुस्त करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.