पुण्यात पीएमपी धावणार; कोणाकोणाला मिळणार प्रवेश, वाचा

घरेलू कामगार, रुग्णांचे नातेवाईक, बाहेरगावचे प्रवासी, लसीकरणाला जाणारे नागरिक यांनाही प्रवास करता येणार
PMP Bus
PMP BusTeam esakal
Updated on

पुणे : अत्याव्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीने ११४ बस रस्त्यावर आणल्या आहेत. ५७ मार्गांवर त्या धावणार आहेत. शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या बसमधून प्रवास करता येईल. सकाळी ६ ते रात्री ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत या बस सुरू राहतील. घरेलू कामगार, रुग्णांचे नातेवाईक, बाहेर गावाहून येणारे प्रवासी आणि लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही बसमधून प्रवास करता येणार आहे. शुक्रवारपासून ही बससेवा सुरू झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालय, दोन्ही महापालिकांचे कर्मचारी, कॅंटोन्मेंट बोर्ड, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, कामगार आयुक्त कार्यालय, अन्न व औषध, रेल्वे, मेडिकल असोसिएशन, बॅंका, खासगी रुग्णालये, आरटीओ, पोलिस, अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक, महावितरण, पत्रकार, एसटी महामंडळाचे कर्मचारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक, घरेलू कामगार, लसीकरणासाठी जाणारे नागरिक आदींना ही बससेवा उपलब्ध असेल, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

PMP Bus
पुणे : २४ तासात कोरोनाने घेतले शंभराहून अधिक बळी

पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर येथे बाहेरगावाहून येणऱ्या प्रवाशांनाही बसमधून प्रवास करता येईल. बसमधून प्रवास करताना राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन प्रवाशांना करावे लागेल. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक असेल, असेही त्यांनी सांगितले.

स्वारगेट, नरवीर तानाजी वाडी, कोथरूड, कात्रज, हडपसर, निगडी, भोसरी, पिंपरी आदी आगारांतून ही दर एक अर्धा ते एक तासाला बस सुटणार आहेत. त्यासाठी ५७ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पुणे महापालिका येथील पास केंद्र आणि पिंपरी चिंचवड महापालिकेजवळील लोखंडे सभागृह येथील पास केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान सुरू राहणार आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.

कामगारांची वाहतूक करण्यासाठी बस

चाकणमधील एका कंपनीने कामगारांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीच्या तीन बस ८३ रुपये ५१ पैसे प्रती किलोमीटर दराने भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. त्यातून तीन शिफ्टमधील कर्मचाऱ्यांची वाहतूक होणार आहे. त्याचा मार्ग संबंधित कंपनीने पीएमपीच्या मदतीने निश्चित केला आहे. आणखी काही कंपन्यांनीही कामगारांचीही वाहतूक करण्यासाठी पीएमपीकडे विचारणा केली असून त्या बाबत चर्चा सुरू आहे. कंपन्यांसाठी एसी बसही उपलब्ध करून देण्याची तयारी पीएमपीने दर्शविली आहे, असे झेंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.