Pune : पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर

महापालिका प्रशासनाने पुराच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या सुमारे दीड हजार अधिक लोकांचे स्थलांतर केले. महापालिकेचे योग्य नियोजन व समन्वयामुळे नागरिकांना योग्य वेळेत मदत मिळण्यास मदत झाली.
Pune
Pune sakal
Updated on

पुणे : महापालिका प्रशासनाने पुराच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या सुमारे दीड हजार अधिक लोकांचे स्थलांतर केले. महापालिकेचे योग्य नियोजन व समन्वयामुळे नागरिकांना योग्य वेळेत मदत मिळण्यास मदत झाली.

खडकवासला व पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने रविवारी मुळा मोठा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या सोसायट्या,वस्त्यामध्ये रविवारी सकाळपासूनच पाणी शिरण्यासाठी सुरुवात झाली. दरम्यान, महापालिका प्रशासनाने खबरदारी घेत नागरिकांना पुराचे पाणी येणार असल्याची पूर्व सूचना दिली होती. तसेच ठीकठिकाणी महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय, अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, पीएमआरडीए पुराचे पाणी शिरणाऱ्या भागात हजर होते. महापालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शनिवारी मध्यरात्रीपासूनच पूरस्थिती वरती लक्ष ठेवून होते. याबरोबरच पूरबाधित नागरिकांना मदत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते.

महापालिका प्रशासनाने एकता नगर, ताडीवाला रोड, मुळा रोड, शांतीनगर झोपडपट्टी, इंदिरानगर झोपडपट्टी, चिमा गार्डन, यशवंत नगरी कळस, साईनाथ नगर वडगाव शेरी, पुलाचीवाडी, पाटील इस्टेट झोपडपट्टी, रजपूत झोपडपट्टी, तपोधाम इंदिरा नगर वसाहत, नारायण पेठ, अमृतेश्वर घाट, मंगळवार पेठ, श्रमिक नगर दत्तवाडी, बोपोडी, बालेवाडी गाव अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या नागरिकांना दुपारीच बाहेर काढले. पीएमपी बस द्वारे नागरिकांना जवळच्या महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरते निवासासाठी ठेवले. तेथे नागरिकांची जेवण नाश्त्याची व्यवस्था ही केली. महापालिकेने एकूण 387 कुटुंबातील सुमारे दीड हजार नागरिकांना जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित केले. अशी माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन निवारण कक्षाचे अधिकारी गणेश सोनुने यांनी दिली.

पीएमआरडीए कडून २२५ कुटुंबाचे स्थलांतर महापालिका प्रशासनाप्रमाणेच

पीएमआरडीएच्या पथकाने ही नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवून त्यांचे प्राण वाचवले. पीएमआरडीएच्या पथकाने विश्रांतवाडी शांतीनगर याबरोबरच एकता नगर मधील नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवले रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सव्वा दोनशे कुटुंबांची नजीकच्या शाळा समाज मंदिर येथे तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली. तसेच नागरिकांना जेवण, नाश्ता ही पुरविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.