पुण्यात साधे पेट्रोलही शंभर रुपयांच्या घरात

कच्च्या तेलाच्या उत्पादनात झालेली घट आणि प्रति बॅरल वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत आहे.
Petrol
PetrolSakal
Updated on

पुणे - कच्च्या तेलाच्या (Crude Oil) उत्पादनात झालेली घट आणि प्रति बॅरल वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती (Rate) यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) इंधनाचे दर (Fuel Rrate) वाढत आहे. त्याचा फटका देशातही बसत असून, इंधनाच्या किमती वाढतच आहे. त्यामुळे शहरात साधे पेट्रोलही (Petrol) आता १०० रुपयांच्या तर डिझेल (Diesel) ९० रुपयांच्या घरात गेले आहे. (Even a simple petrol in Pune costs a hundred rupee)

शहरात मंगळवारी साध्या पेट्रोलची किंमत ९७.८२ रुपयांपर्यंत पोचली आहे. तर डिझेल ८७.८२ रुपये लिटर प्रतिलिटर झाले आहे. पॉवर पेट्रोल १०१.५० रुपये प्रतिलिटर असून सीएनजीचे दर मात्र ५५.५० रुपये किलोवर स्थिर आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आधीच नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. त्यात आता इंधन दरवाढीची झळही सोसावी लागत असल्याने वाहनचालकांचा खिसा आणखी खाली होणार आहे.

डिसेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत ५० डॉलरच्या घरात होती. सध्या हे दर ६७ डॉलर बॅरल झाले आहेत. तर तेल उत्पादक देशांकडून अद्यापही पुरेसे कच्चे तेल पुरविले जात नाही. त्यामुळे किमती वाढतच असल्याची माहिती ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिली.

Petrol
पुण्यात लाखभर ज्येष्ठ लसीविना; २.७१ लाख ज्येष्ठांनी घेतला पहिला डोस

कर कमी केला तरच दिलासा

पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध प्रकारचे कर आकारण्यात येत आहेत. या करांची रक्कम मोठी असून कोरोनाकाळात देखील काही कर लावण्यात आले आहेत. वाहनचालकांचा इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी करांची रक्कम कमी करणे हा सोपा मार्ग आहे. मात्र तसे केल्यास सरकारचे उत्पन्न कमी होऊ शकते. पण जर कर कपात केली तर वाहन चालकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्‍वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

पुढील महिन्यातही वाढ

कच्च्या तेलाचा अपुरा पुरवठा व आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे पुढील महिनाभरात डिझेल दोन ते तीन आणि तीन ते चार रुपयांनी पेट्रोल वाढू शकते, असा अंदाज ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे व्यक्त केला आहे.

मंगळवारचे पुण्यातील इंधनाचे दर

पेट्रोल ९७.८२

पॉवर पेट्रोल १०१.५०

डिझेल ८७.८२

सीएनजी ५५.५० प्रतिकिलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.