मतदार जनजागृतीच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

'देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे.
Election Commissioner Rajeev Kumar
Election Commissioner Rajeev KumarSakal
Updated on
Summary

'देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे.

औंध - देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ पुण्यातून करण्यात आला. यानिमित्ताने मुख्य आयुक्त व आयुक्त यांनी महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून मतदार जनजागृती सायकल फेरीत सहभागी होत या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ. रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, दिग्दर्शक नागराज मंजुळे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, निवडणूक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, स्वीप संचालक संतोष अजमेरा आदी उपस्थित होते.

'देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे. शहरी भागात मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुण्यातून होत असल्याचे 'उद्घाटन प्रसंगी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

'मतदानाविषयी जागरूकता आणण्यासाठी सर्वांनी मतदार जागृतीच्या कार्यात सहभागी व्हावे, निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावावा आणि निवडणूक आयोगाचे दूत म्हणून कार्य करावे' असे आवाहन त्यांनी केले.तर 'लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी' असे आवाहन निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी केले.चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी युवा मतदारांना मतदार नोंदणीसह मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन केले.

'राज्यातील प्रत्येक गावात १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन,नवीन मतदारांची नोंदणी करण्यात येणार असून, प्रत्येक महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार' असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले. युवा मतदार सार्थक पाडाळे, तृतीयपंथी समुदायातील मतदार सानवी जेठवानी,अमित मोहिते, ज्येष्ठ नागरिक आनंद पाडाळे, दिव्यांग मतदार शिवाजी भेगडे यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल फेरीचा शुभारंभ केला. सायकल फेरीच्या शुभारंभ प्रसंगी नेमबाज अंजली भागवत, बॅडमिंटनपटू निखिल कानिटकर, बुद्धिबळपटू अभिजित कुंटे, बॉक्सर मनोज पिंगळे, सुमेश झेपे, आशिष माने, आनंद माळी, अजित लाक्रा, शकुंतला खटावकर, मिलिंद झोडगे उपस्थित होते.

झोपडपट्टीतील नागरीकांशी मुख्य आयुक्तांचा संवाद

सायकल फेरीदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी कस्तुरबा गांधी वसाहत येथील नागरिकांशी संवाद साधला. युवकांसह वयोवृद्धांनीही मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.तसेच यावेळी पुण्याची ओळख असलेल्या ढोल पथकाचे आणि पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

या सायकल फेरीला शिवछत्रपती क्रीडा संकुलातून सुरूवात होऊन राधा चौक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक - राजभवन - केंद्रीय विद्यालय समोरून - कस्तुरबा वसाहत - ब्रेमेन चौक - परिहार चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - मेरी पॉईंट हॉस्पिटल - ताम्हाणे चौक - ज्युपिटर हॉस्पिटल - बाणेर बालेवाडी फाटामार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुलात समारोप झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.