परीक्षा लांबणीवरच पडत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये अस्वस्थता वाढली

Pune University
Pune University
Updated on

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा लांबणीवरच पडत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. विद्यापीठाकडून निर्णय होत नसल्याने, एजन्सी निवडीबाबत गोंधळ निर्माण करून शंकेला वाव निर्माण केला जात आहे. परीक्षा मंडळ, व्यवस्थापन परिषदेने वेळेवर निर्णय घेतले असते तर ही नामुष्की ओढवली नसती अशा शब्दात प्राध्यापक संघटनांकडून विद्यापीठाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा १५ मार्चपासून टप्प्याटप्प्‍याने सुरू होणार होती, पण आता आॅनलाइन एजन्सी निवडीवरून विद्यापीठातील अधिकारी, व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्यातील मतभिन्नतेमुळे प्रक्रिया ठप्प आहे. यामुळे प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘परीक्षा मंडळाने परीक्षा घेण्याचा निर्णय केल्यानंतर शेवटच्या क्षणी एजन्सीचा मुद्दा उपस्थित केला गेला. परीक्षा मंडळाला त्यांचे अधिकार वापरू दिले पाहिजेत. या सर्व गोंधळामुळे कोणाला तरी समोर ठेऊन त्यांच्‍या हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे का? अशी शंका निर्माण होत आहे. यामध्ये परीक्षेला उशीर होत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापक अस्वस्थ आहेत. कुलगुरू, प्र-कुलगुरू यांनी याबाबत स्पष्टता आणली पाहिजे.’
- कान्हू गिरमकर, अध्यक्ष, स्पुक्टो

‘प्रथम सत्र परीक्षा एप्रिलमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या उशिरा परीक्षा घेणे योग्य नाही त्यामुळे प्रथम व द्वितीय सत्राची परीक्षा एकत्र झाली पाहिजे असे बहुतांश प्राचार्यांचे म्हणणे आहे.एजन्सीचा विषय गोपनीय असल्याने त्याबाबत माहिती नाही. व्यवस्थापन परिषदेत परीक्षेबाबत चर्चा करू’’
-सुधाकर जाधवर, सचिव, प्राचार्य महासंघ

‘विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेची जानेवारी महिन्यात तयारी सुरू केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. परीक्षांना उशीर होणार असल्याने दोन्ही सत्राची एकत्र परीक्षा घ्या असा मतप्रवाह समोर येत आहे. याबाबत स्पष्टता आली पाहिजे’’
-सोपान राठोड, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ

‘विद्यापीठाने एका आठवड्यात परीक्षेचे नियोजन करावे अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल. परीक्षेचा असा
गोंधळ निर्माण करणे विद्यापीठाला शोभणारे नाही’’
- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, मनविसे

‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, प्रत्येत सत्राची स्वतंत्र परीक्षा घेण्याऐवजी प्रथम व द्वितीय सत्राची परीक्षा एकत्र घ्यावी.
- सुजितकुमार थिटे, अध्यक्ष, पदवीधर संघटना

कुलगुरूंचे मनोगत प्रसारित
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा ३ मार्च रोजी युट्यूब चॅनलवरून ‘मनोगत कुलगुरूंचे याचा १२वा भाग प्रसारित करण्यात आला. या १२ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये विद्यापीठाचा वर्धापन दिन, यूजीसीतर्फे प्राध्यापकांना प्रशिक्षण, इनोफेस्ट २०२१, युटिक्स आणि उत्तराखंड येथे आलेला महापूर याची माहिती कुलगुरूंनी दिली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.