पुणे - शहरातील कमला नेहरू रुग्णालयात बुधवारी (ता. १४) सकाळी दहशतवादी घुसल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत ते मूळचे बिहारचे असून, वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.