संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन पुण्यात भरविण्यात येणार आहेत.
पुणे - संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन पुण्यात भरविण्यात येणार आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) तर्फे तीन दिवसीय ‘डिफटेक’ या अत्यंत महत्त्वकांक्षी प्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन चिंचवड येथे करण्यात आले आहे. यामध्ये संरक्षण उत्पादनांमध्ये गुंतवणूक, उत्पादनांचे निर्यात, बदलत्या युद्धनीतीनुसार नवनविन तंत्रज्ञानाची आवश्यकता अशा अनेक गोष्टींवर परिषदेत भर दिला जाणार आहे.
त्याचबरोबर देशातील संरक्षण उत्पादनात योगदान देणारे उद्योग, टेक्नोक्रॅट्स, तसेच स्टार्टअपसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषद आणि प्रदर्शनाचा उद्देश आहे. या तीन दिवसीय परिषदेत उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शन तसेच संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांशी निगडीत विविध विषयांवरील मार्गदर्शन तज्ञांद्वारे केले जाणार आहे. यामध्ये ५० हून अधिक उद्योगांचे प्रदर्शन असून २० पेक्षा जास्त स्टार्टअप्सचा सहभाग असेल. ही परिषद व प्रदर्शन येत्या शुक्रवारपासून (ता. ७) ते रविवार (ता. ९) ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे होणार आहे. परिषद सर्वांसाठी खुली राहणार आहे, अशी माहिती एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.