Pune Railway News : रेल्वेचा इतिहास अनुभवता येणार ; पुणे स्थानकात नॅरोगेज डब्यात साकारणार गॅलरी

रेल्वेप्रेमींना व अभ्यासकांना लवकरच रेल्वेतील जुन्या वस्तू, रेल्वेच्या रंजक कथांची माहिती उपलब्ध होणार आहे. पुणे रेल्वे प्रशासन पहिल्यांदाच ‘हेरिटेज गॅलरी’ सुरू करीत आहे.
Pune Railway News
Pune Railway News sakal
Updated on

पुणे : रेल्वेप्रेमींना व अभ्यासकांना लवकरच रेल्वेतील जुन्या वस्तू, रेल्वेच्या रंजक कथांची माहिती उपलब्ध होणार आहे. पुणे रेल्वे प्रशासन पहिल्यांदाच ‘हेरिटेज गॅलरी’ सुरू करीत आहे. १९५० च्या दशकात धावणाऱ्या नॅरोगेजवरच्या प्रवासी डब्यात पुणे स्थानकाच्या मागे असलेल्या जागेत ही हेरिटेज गॅलरी साकारण्यात येत आहे.

रेल्वेच्या जुन्या स्वरुपाची माहिती नव्या पिढीला व्हावी, याकरिता रेल्वेचा कार्मिक विभाग विशेष प्रयत्न करीत आहे. यासाठी वेगवेगळ्या स्थानकांवर आता इतिहासजमा झालेल्या वस्तूंची शोध मोहीम सुरू झाली आहे. यापैकी काही वस्तू रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. यात सिग्नल यंत्रणेपासून अगदी घड्याळाचाही समावेश आहे. तर खडकी स्थानकावर १८८० साली बसविण्यात आलेल्या अग्निशमन यंत्रणेचा देखील यात समावेश असणार आहे. ही गॅलरी सर्वांसाठी खुली करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

‘वशिष्ठ’मध्ये असणार प्रदर्शन

पुणे रेल्वे स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या पादचारी पुलाजवळ आकर्षक रंगरंगोटी करून रेल्वेचा छोटा डबा ठेवण्यात आला असून, रेल्वे प्रशासनाने त्याला ‘वशिष्ठ’ असे नाव दिले आहे. या डब्यात पूर्वी अनारक्षित तिकीट विक्री केंद्र सुरू करण्यात आले होते.

Pune Railway News
Pune University : विद्यापीठाने मराठीचा अनुशेष भरून काढला ; डॉ. सदानंद मोरे ,मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन

मात्र दरम्यानच्या काळात या डब्यात साप आढळल्याने कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम करण्यास नकार दिला. तेव्हापासून बंद अवस्थेत असलेल्या या डब्यात हेरिटेज गॅलरी सुरू करण्याचा निर्णय कार्मिक विभागाने घेतला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत रेल्वेप्रेमींना ही गॅलरी पाहता येईल.

पुण्यात पहिल्यांदाच रेल्वेची हेरिटेज गॅलरी सुरू होत आहे. यात प्रवाशांना, पर्यटकांना रेल्वेविषयीची महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच या निमित्ताने इतिहासजमा झालेल्या अनेक वस्तूंचे पुढच्या पिढीसाठी जतन केले जाणार आहे.

- ब्रिजेश कुमार सिंग,

अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.