पुणे : दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका (पॉलेटेक्निक), तसेच बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तीन सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता पूर्णवेळ पोस्ट दहावी एसएससी आणि पोस्ट एचएससी या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित आणि विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळझी करणे आणि अर्ज निश्चिती करणे या प्रक्रियेच्या अंतिम दिनांकास तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी राज्यात एकूण एक लाख तीन हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत ७८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने निश्चित केला आहे. मात्र, दहावीच्या आणि बारावीच्या निकालात यंदा वाढ होऊनही या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या प्रक्रियेतंर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने ‘http://www.dtemaharashtra.gov.in’ या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
दहावीनंतर पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक :
तपशील : कालावधी
- प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे: ३ सप्टेंबरपर्यंत
-तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ५ सप्टेंबर
- तात्पुरत्या गुणवत्ता याद्यामध्ये तक्रारी असल्यास सादर करणे : ६ ते ८ सप्टेंबर
- अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ९ सप्टेंबर
बारावीनंतर पदविका टेक्निकल प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक :
तपशील : कालावधी
- प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे : ३ सप्टेंबरपर्यंत
-तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ५ सप्टेंबर
- तात्पुरत्या गुणवत्ता याद्यामध्ये तक्रारी असल्यास सादर करणे : ६ ते ७ सप्टेंबर
- अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ८ सप्टेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.