Pune Porsche Accident: पुण्यातील हप्तेखोरीचे रेटकार्ड वाचा! पब, बार कडून किती घेतात पैसा? हप्ता घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे नावेही समोर

Extort Money Rate Card: पुण्यात खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्काच्या पुणे विभागात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हप्ते घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्यासाठी वसुली करणाऱ्यांची नावे देखील रवींद्र धंगेकर यांनी वाचून दाखवली.
pune Extort Money Rate Card viral
pune Extort Money Rate Card viral esakal
Updated on

Extort Money Rate Card:

पुण्यात कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणानंतर अनेक मोठे खुलासे होत आहेत. शहरात अवैधरीत्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल (सोमवार) राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी विभागाला पुण्यातील हप्तेखोरीचे रेटकार्ड देण्यात आला. हे रेटकार्ड आता समोर आले आहे. 

हप्ते घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्यासाठी वसुली करणाऱ्यांची नावे देखील रवींद्र धंगेकर यांनी वाचून दाखवली. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्काच्या पुणे विभागात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

सुषमा अंधारेंनी वाचून दाखवलेली यादी -

  • एजंट जॅक्स : आऊटलेटप्रमाणे प्रत्येकी ५० हजार (१२ ले आऊट)

  • बाळासाहेब राऊत व सचिन गोरे (६६ बार, ३० वाईन शॉप, ३५ बिअर शॉप)

  • सनी होरा (१८ हॉटेल,बार, २ वाईन शॉप, ३ बिअर शॉप व अन्य ठाबे)

  • कैलास जगताप व अन्य (११ बार, ८ वाईन शॉप, ९ बिअर शॉप)

  • बॉलर-२ लाख रुपये

  • ठिकाणा - दीड लाख रुपये

  • टू बीएचके, डिमोरा( राज बहादूर मिल्स), सरोवर हॉटेल, द माफीया, मिलर, प्रत्येकी १ लाख रुपये. 

  • बॅक स्टेज - ९० हजार रुपये

  • टीटीएम रुपटॉप, स्काय स्टोरी, जिमी का ढाबा (पाषाण), ढोनी का ढाबा, टल्ली टुल्स,  प्रत्येकी ५० हजार रुपये.

  • आयरीश - ४० हजार रुपेय

  • अॅटमोस्पिअर, रूड लॉर्ड -  - ६० हजार रुपये

  • २४ के बालेवाडी - १ लाख ५० हजार रुपये. 

  • कोको रिको, स्मोकी बिज - ७५ हजार रुपेय

महिन्याला ७८ लाख कलेक्शन तर २ वर्षात नवीन परवाना केलेल्यांकडून २.५ कोटी वसुली करण्यात आल्याचे धंगेकरांनी सांगितले.

pune Extort Money Rate Card viral
Pune : भ्रष्ट यंत्रणेमुळे ‘ससून’ची लक्तरे चव्हाट्यावर! मद्यपार्टी, राजकीय हस्तक्षेप, लागेबांधे, वशील्याने व्यवस्था पोखरली

वसुली करणारे अधिकारी कोण?

यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हप्ते घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी नावे देखील वाचून दाखवली. ते म्हणाले, नाईट लाईफला सर्वात जास्त सपोर्ट अधीक्षक चरण सिंग राजपूत यांचा आहे. यांना साधारण महिन्याचे प्रत्येक हॉटेल मधून पैशाचे पाकीट पुरवले जाते.

विमाननगर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, भुगांव भुकूम, बाणेर, हिंजेवाडी, पिंपरी चिंचवड, लोणावळा आदी. भागातील कलेक्शन करणारे - कॉन्स्टेबल सागर धुर्वे, तात्या शिंदे, समीर पडवळ, स्वप्नील दरेकर, गोरे मेजर, गोपाल कानडे तसेच खाजगी व्यक्ती युवराज पाटील, मुन्ना शेख, रवी पुजारी, तानाजी पाटील, माऊली शिंदे, राजु इ. व काही लायसन्स धारक जसे राहुल रामनाथ, सुन्नी सिंह होरा, बाळासाहेब राऊत हे पण वसुली करतात असल्याचे रवींद्र धंगेकर म्हणाले. 

pune Extort Money Rate Card viral
Pune Accident News: पोर्शे अपघातानंतर पुन्हा पुणे हादरलंं! ट्रकने महाविद्यालयीन तरुणांना चिरडले, २ जणांचा मृत्यू, १ जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.