बहुराष्ट्रीय कंपनी अर्न्स्ट अँड यंग (EY) च्या पुण्यात काम करणाऱ्या 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा मृत्यू, कथित कामाच्या दबावामुळे झाल्याचे आरोप होत असल्यामुळे, सोशल मीडियावर मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे मोठ्या व्यावसायिक कंपन्यांमधील कामाच्या दडपणाचा कौतुक करण्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आहे.
केरळमधील एना सेबॅस्टियन पेरिले या तरुणीने अवघ्या चार महिन्यांपूर्वी पुण्यातील EY कार्यालयात काम करण्यास सुरुवात केली होती. व्यवस्थापक तिच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा टाकत असल्याचा आरोप होत आहे.
ॲनाची आई अनिता ऑगस्टिन यांनी EY चे भारतातील प्रमुख राजीव मेमानी यांना पत्र लिहून कंपनीच्या कार्यसंस्कृतीवर गंभीर आरोप केले आहेत.
अनिता यांनी लिहिले की, "एनाने नोव्हेंबर 2023 मध्ये सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तीने मार्च 2024 मध्ये एनवायमध्ये काम करायला सुरुवात केली. ती आंनंदीत होती कारण तिला नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळाली होती. पण अवघ्या चार महिन्यांनंतर एनाच्या मृत्यूची बातमी कळताच माझा संसार उध्वस्त झाला. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे कंपनीतील कोणीही तिच्या अंत्यसंस्कारालाही आले नाही."
या पत्रात अनिता यांनी एनावर सतत कामाचा बोजा कसा होता हे सांगितले आहे. "करिअरमध्ये मोठी प्रगती होईल, असे सांगून तिला अधिक काम करण्यास प्रवृत्त केले जायचे. ओव्हरवर्किंग सर्व कामगार करतात असे सांगून कौतुक करण्यात यायचे. अनेकदा ती रात्रभर कंपनीत काम करायची त्यामुळे ती झोपायचीही नाही. अनेकदा तिला कार्यालयीन वेळेनंतर काम दिले जात होते आणि ते पूर्ण करण्यासाठी अवघे काही तास दिले जायचे. यामुळे तिची तब्येत बिघडली, जे तिच्या मृत्यूचे कारण ठरले."
अनिता य़ांनी पुढे लिहिले की, "नवीन कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस, अगदी रविवारीही काम करत राहणे याचे समर्थन कोणीही करू शकत नाही. माझी मुलगी खूप विनम्र होती, तिने तिच्या व्यवस्थापकांबद्दल कधीही तक्रार केली नाही, परंतु मी शांत राहू शकत नाही. या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणा एका व्यक्तीचा दोष नसून संपूर्ण यंत्रणेचा दोष आहे. आपल्या तरुणांच्या जीवनाशी खेळणे अवास्तव अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी तरुणांच्या जीवाशी खेळणे योग्य नाही."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.