ॲना सेबॅस्टियनच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा; परवान्याशिवाय EY कंपनीचे कार्यालय सुरू, ओव्हरटाइमसंदर्भात अनेक कायद्याचे उल्लंघन

EY Pune Office Under Scrutiny for License Violation Since 2007: या प्रकरणातील तणावपूर्ण कामाच्या परिस्थितीमुळे केंद्र सरकारने लक्ष घातले असून केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.
EY Pune office facing legal action for operating without a license since 2007, following the death of a woman employee.
EY Pune office facing legal action for operating without a license since 2007, following the death of a woman employee.esakal
Updated on

पुणे: आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अकाउंटिंग कंपनी अर्न्स्ट अँड यंग (EY) च्या पुणे कार्यालयासंबंधी गंभीर आरोप समोर आले आहेत. 2007 पासून परवानाशिवाय कार्यरत असलेल्या या कार्यालयावर महाराष्ट्र श्रम विभागाने कारवाई करण्याचे ठरवले आहे. शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट्स कायद्याअंतर्गत परवाना घेतल्याशिवाय काम करणे हा कायद्याचा स्पष्ट उल्लंघन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्रम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, EY च्या पुणे कार्यालयाने शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट्स कायद्याअंतर्गत आवश्यक परवाना घेतलेला नाही. हा कायदा कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी असतो, ज्यात त्यांच्या हक्कांचे संरक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेचा समावेश असतो. या उल्लंघनामुळे कंपनीला नोटीस पाठवली जाईल आणि उत्तरानुसार पुढील कारवाई केली जाईल.

मृत्यूच्या घटनेमुळे श्रम विभागाची कारवाई-

चॅर्टर्ड अकाउंटंट अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायल या 26 वर्षीय महिलेचा जुलैमध्ये पुण्यात EY कंपनीमध्ये काम करत असताना मृत्यू झाला होता. या घटनेनंतर EY कंपनीवर कामाच्या ओझ्यामुळे तणाव निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. अ‍ॅनाच्या आईने EY इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना लिहिलेल्या पत्रात या तणावामुळे तिच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळले होते.

या गंभीर घटनेनंतर केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र श्रम विभागाने EY पुणे कार्यालयाची तपासणी केली. या तपासणीमध्ये, कंपनीने शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट्स कायद्याअंतर्गत 2007 पासून परवाना घेतला नसल्याचे उघड झाले. अतिरिक्त श्रम आयुक्त शैलेंद्र पोल यांनी यासंदर्भात माहिती दिली.

EY Pune office facing legal action for operating without a license since 2007, following the death of a woman employee.
26 वर्षीय तरुणीच्या मृत्यूनंतर EY कंपनीची चौकशी! श्रम आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिला 7 दिवसांचा वेळ

कार्यालयाचा परवाना नसल्याचे उल्लंघन

शैलेंद्र पोल यांनी सांगितले की, "शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट्स कायद्याअंतर्गत कामकाजाच्या विविध घटकांचे निरीक्षण केले असता, EY च्या पुणे कार्यालयाने या कायद्याच्या अटींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. कामाच्या अटी, किमान वेतन, मातृत्व लाभ, वेतन भरणा आणि ओव्हरटाइम वेतनासंदर्भातील अनेक कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळले."

EY पुणे कार्यालयाच्या या कारवाईनंतर, श्रम विभागाने शो-कॉज नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या उत्तरानुसार पुढील कारवाई होईल. यासोबतच, कामाच्या ओझ्यामुळे होणारे कर्मचारी मृत्यू रोखण्यासाठी सरकारच्या पातळीवर कठोर पावले उचलली जातील, असेही संकेत दिले आहेत.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवियांचा हस्तक्षेप

या प्रकरणातील तणावपूर्ण कामाच्या परिस्थितीमुळे केंद्र सरकारने लक्ष घातले असून केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

EY Pune office facing legal action for operating without a license since 2007, following the death of a woman employee.
Pune Court : दाव्यांच्या वाढत्या संख्येमुळे ‘तारीख पे तारीख’,पुणे न्यायालयातील न्यायाधीश व दाव्यांच्या प्रमाणात विसंगती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.