पुणे - लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून जवानांपर्यंत सर्वांनाच फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यावरील त्यांचे अकाउंट्स बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. एकूण 89 ऍप वापरावरही बंदी घातली आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विविध यंत्रणाही कार्यान्वित केल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय लष्कराकडून घेण्यात आला आहे.
सोशल मिडियाचा सरसकट वापर बंद करण्यात आलेला नाही. या बंदीत व्हॉटसअप, ट्विटर यांचा समावेश नाही. मात्र, फेसबुक, इन्स्टाग्राम यांचा समावेश आहे. देशात गेल्या चार वर्षांत हनी ट्रॅपची सुमारे 25 प्रकरणे झाली आहेत. तसेच हेरगिरीच्या काही प्रकरणांतही फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर संभाषणासाठी झाल्याचे दिसून आले आहे. फेसबुकवरील अपडेटसचा वापर राष्ट्रविघातक घटक करीत असल्याचेही तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले होते. चीन आणि पाकिस्तानमधील यंत्रणाही देशातील सोशल मिडीयावर लक्ष ठेवून असल्याचे वारंवार आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुक, इन्स्टाग्रामसह काही ई- कॉमर्स ऍप, डेटिंग ऍप, व्हिडीओबेस्ड ऍपवरही बंदी घातली आहे.
या बंदीबाबतचे आदेश जुलैमध्ये काढले होते. मात्र, गेल्या महिन्यापासून त्याच्या काटेकोर अंमबवजावणीला प्रारंभ झाला आहे.
बंदी घालण्यात आलेल्या 89 ऍपमध्ये अनेक कंपन्या चीनमधील आहेत. त्यांचे सर्व्हर तेथे आहेत. त्यामुळे भारतीयांची माहिती त्यांच्या सर्व्हरमध्ये जमा होत असल्याचे दिसून आल्यावर केंद्र सरकारने या बंदीबाबत सूतोवाच केले होते. लष्करी यंत्रणांनीही त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. देखरेख करण्यासाठी मिलिटरी इंटलिजन्स आणि "एनटीआरओ' (नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन) यांचीही माहिती घेतली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सोशल मीडियावरील माहिती शत्रू राष्ट्रांपर्यंत पोचत असते. तसेच मोबाईल फोनही सुरक्षित नाहीत. त्यातील मेसेज, संभाषणावर लक्ष ठेवले जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य आहे. अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबीयांनीही सोशल मीडियाचा वापर कमी करण्याची गरज आहे.
- डॉ. दत्तात्रेय शेकटकर, लेफ्टनंट जनरल, निवृत्त
सोशल मीडियाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे वैयक्तिक संभाषणावरही मर्यादा आल्या आहेत. तसेच काही स्वयंघोषित डिफेन्स एक्स्पर्ट त्यांची मते, माहिती सोशल मीडियावर टाकतात. त्यातून काही माहिती सार्वजनिक होते. त्यामुळे त्यावर मर्यादा आणणे गरजेचे होते. आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे, ही गरजेची आहे.
शशिकांत ओक, विंगकमांडर, निवृत्त
बंदी घालण्यात आलेले प्रमुख ऍप
चॅटिंग प्लॅटफॉर्म, व्हिडिओ बेस्ड ऍप, कंटेन्ट शेअरींग, वेब ब्राऊसर्ज, व्हिडिओ अँड लाइव्ह स्ट्रिमिंग, युटिलिटी ऍप, गेमिंग ऍप, डेटिंग ऍप, ई- कॉमर्स, ऍन्टी व्हायरस, न्यूज ऍप्स, ऑनलाइन बुक रीडिंग ऍप, म्युझिक ऍप, ब्लॉगिंग ऍप, लाइफ स्टाइल ऍप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.