Faculty of Arts : कला शाखेकडे वाढता कल! हुशार विद्यार्थ्यांचीही पसंती, नवनव्या व्यावसायिक संधीचा परिणाम

कला शाखा निवडल्यास विद्यार्थ्यांना नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत.
education
educationesakal
Updated on

Faculty of Arts - अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशात वाढलेली स्पर्धा; परिणामी विद्यार्थी-पालकांचा वाढणारा ताण यांसह कला शाखेतून नवनव्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध होणाऱ्या संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी असणारा राजमार्ग, नव्याने खुल्या होणाऱ्या व्यावसायिक वाटा यामुळे हुशार विद्यार्थी कला शाखेला पसंती देत आहेत. म्हणूनच आता इयत्ता अकरावी असो वा प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम असो यात कला शाखेतील प्रवेशासाठी हुशार विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगल्याचे चित्र दिसते.

हुशार विद्यार्थी म्हणजेच याठिकाणी साधारणतः दहावी-बारावीत ८० ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थी. विद्यार्थ्यांना साधारणतः ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्यास विज्ञान शाखेत प्रवेश हे समीकरण ठरलेलेच असते. परंतु आता परीक्षेत ९० टक्के, ९५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले तरीही हजारो विद्यार्थी विज्ञान शाखेला बाजूला सारून सरळ कला शाखेत प्रवेश घेत आहेत.

education
Pune Admission : औंध आयटीआयमध्ये ३३ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

विशेषतः कला शाखेचा इंग्रजी माध्यमातून अभ्यास करण्याला अनेक विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. त्याशिवाय कला शाखेतून मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र तसेच परदेशी भाषा यात करियरच्या नानाविध संधी खुल्या होत आहेत. यातून चांगले व्यावसायिक पर्याय उपलब्ध होत असल्याने आता अनेक हुशार विद्यार्थी कला शाखेतून अभ्यास करण्याला विशेष महत्त्व देत आहेत.

इयत्ता अकरावीचा कट-ऑफ

महाविद्यालय पहिली फेरी दुसरी फेरी

फर्ग्युसन महाविद्यालय ९६.४ टक्के ९६ टक्के

सिंबायोसिस महाविद्यालय ९३.६० टक्के ९२.४० टक्के

स.प. महाविद्यालय ९२.२० टक्के ९१.८० टक्के

मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर ८८.८० टक्के ८८.४० टक्के

नौरोसजी वाडिया महाविद्यालय ८६.४ टक्के ८६ टक्के

education
Pune 'सकाळ'च्या बातमीचा परिणाम! पेन्शन प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी स्थापन होणार स्वतंत्र कक्ष

कल वाढण्याची कारणे

नवनव्या क्षेत्रांमध्ये खुल्या होणाऱ्या संधी,

कला शाखेत मानव्यशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्राच्या क्षेत्राला आलेले महत्त्व

तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, भूगोल, परदेशी भाषा विषयांतील वाढत्या संधी

स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होण्यासाठी

व्यावसायिक अभ्यासक्रमात वाढलेली चुरस

विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमातील वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थी-पालकांचा वाढणारा ताण

कला शाखा निवडल्यास विद्यार्थ्यांना नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेतील सर्व विषय आहेत, त्याशिवाय फ्रेंच, जर्मन यांसारख्या परदेशी भाषा शंभरहून अधिक वर्षांपासून शिकविल्या जातात.

त्यामुळे विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे ओढा असतो. चांगले गुण असूनही अनेक विद्यार्थी केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायच्या दृष्टिकोनातून कला शाखेतून शिक्षण घेतात. त्याशिवाय मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्राला विशेष महत्त्व आले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता ६० टक्के हे केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम आणि ४० टक्के हे व्यक्तिगत विकासावर भर असेल, त्यामुळेही अनेक विद्यार्थी कला शाखेतील काही विषयांची अभ्यासक्रमासाठी निवडतील, असे चित्र आहे.

- डॉ. नितीन कुलकर्णी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय

education
Education : पीएच.डी. असल्यास सेट-नेटची गरज नाही; युजीसीकडून स्पष्टीकरण

इंग्रजीमधून कला शाखेचे शिक्षण घेण्यासाठी फार कमी संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून कला शाखेला हुशार विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे अकरावी असो वा प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम या दोन्ही प्रवेशप्रक्रियेत कला शाखेचा कट-ऑफचा आलेख चढता आहे.

कला शाखेत योग्य विषय निवडल्यास आंतरराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक धोरणे, विविध विश्लेषण अशा क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी-वैद्यकीय अभ्यासक्रमातील फोलपणा लक्षात आलेले विद्यार्थी-पालक अभ्यासासाठी कला शाखेला प्राधान्य देत आहेत.

- डॉ. ऋषीकेश सोमण, प्राचार्य, सिंबायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.