Fake Fertilizer : भेसळयुक्त खतामुळे शेतकरी होणार उद्धवस्त...

जगताप कुंटूबाची संपूर्ण द्राक्ष बाग धोक्यात... वर्षभर कुंटूबाला जगण्याचा पेच...
fake fertilizer damage farmers crops family agriculture marathi news
fake fertilizer damage farmers crops family agriculture marathi newsSakal
Updated on

वालचंदनगर : बोरी (ता.इंदापूर) येथे भेसळयुक्त रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांचा चालू वर्षीचा हंगाम वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुंटूबे उद्धवस्त होणार आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर तर वर्षभर जगायचे कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

येथील शेतकरी संतोष जगताप व महेश जगताप या बंधूचे संपूर्ण अडीच एकर द्राक्ष बागाचे भेसळयुक्त खताने उद्धवस्त केली असून वर्षभर घरातील १२ माणसांना जगवायचे कसे असा पेच निर्माण झाला आहे.

बोरी (ता.इंदापूर) येथे भेसळयुक्त खत वापरल्यामुळे सुमारे ५० शेतकऱ्यांच्या १०० एकर द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे.यामध्ये जगताप कुंटूबाचा ही समावेश आहे. बोरी पाटीजवळ लासुर्णे-बोरी रस्त्यालगत अर्जुन सोपाना जगताप यांचे अडीच एकर क्षेत्र आहे. अडीच एकरामध्ये द्राक्ष बाग आहे. घरामध्ये १२ माणसे आहेत.

घरच्या अडीच एकर द्राक्ष बागेमध्ये काम करुन उर्वरित वेळेमध्ये सर्वजण दुसऱ्याच्या शेतामध्ये मजूरी करीत असतात.गेल्या वर्षी अडीच एकरा द्राक्ष बागेमध्ये खर्च वजावट करुन सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. चालू वर्षीही कष्टाने द्राक्ष बाग फुलविण्याचा प्रयत्न केला.मात्र भेसळयुक्त खताना घात केल्याचे जगताप कुंटूब सांगत होते.

भेसळयुक्त खतामुळे चालू वर्षीचा हंगाम वाया जाणार आहे.एक रुपयाही उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. आत्तापर्यत दीड लाख रुपये खर्च केला असून बाग वाचविण्यासाठी औषधफवारणी सुरु आहे. वर्षभर खायाचे काय ? असा पेच निर्माण झाला असल्याचे संतोष जगताप सांगत होते.

नुकसान भरपाई मिळावी...

आमची काहीही चूक नसताना भेसळयुक्त खतामुळे आमची अडीच एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग उद्धवस्त झाली आहे. एकरी पाच लाख रुपयापेक्षा जास्त नुकसान झाले असून संबधित कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी संतोष जगताप यांच्यासह शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.