रविवार ठरला घातवार; एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू

River_Accident
River_Accident
Updated on

कोळवण (पुणे) : वाळेण (ता. मुळशी) येथे वळकी नदीच्या डोहात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पती-पत्नी आणि तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने पाचही जणांचे मृतदेह ओढ्यातून बाहेर काढले आहेत. 

शंकर दशरथ लायगुडे (वय 38), पौर्णिमा शंकर लायगुडे (वय 36), आर्पिता शंकर लायगुडे (वय 20), अंकिता शंकर लायगुडे (वय 13) आणि राजश्री शंकर लायगुडे (वय 12) (सर्व रा. वाळेण, ता. मुळशी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पौर्णिमा लायगुडे या रविवारी (दि.21) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा पाय घसरला आणि त्या वळकी नदीच्या डोहात बुडाल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या तिन्ही मुलींनी डोहात उड्या टाकून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्या तिन्ही मुली देखील नदीत बुडाल्या. हा प्रकार शंकर दशरथ लायगुडे यांना समजल्यानंतर त्यांनी देखील ओढ्याकडे धाव घेतली आणि कुटुंबाला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही प्राणाला मुकावे लागले. 

मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाने सदर ठिकाणी येऊन सर्व मृतदेह बाहेर काढले. पुढील तपासणीसाठी हे मृतदेह पौड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलेले असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, पोलिस विजय कांबळे, आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.