कोळवण - देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, सर्वजण आनंदात असताना नेहमीच दुर्लक्षित राहिलेला जगाचा पोशिंदा बळिराजाची दिवाळी मात्र शेतात भात काढणीसह इतर कामे करण्यात जात आहे. मोठ्या कष्टाने शेतातून माणिक मोतीरुपी धान्य पिकवून जगाचे पालन पोषण करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्याचे कुटुंब सध्या शेतीच्या कामात व्यग्र आहे.