शिक्रापूर : महावितरणच्या कारभाराचा 13 शेतकरी कुटुंबांना मोठा फटका 

शिक्रापूर : महावितरणच्या कारभाराचा 13 शेतकरी कुटुंबांना मोठा फटका 
Updated on

शिक्रापूर : व्हॅलेंटाईन डे ची व्यावसायिक संधी साधून चांगल्या उत्पन्नाच्या प्रतिक्षेत असलेल्या जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील 13 शेतकरी कुटुंबाच्या शेतातील चार ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पूरवठाच महावितरणने गेल्या चार दिवसांपासून तोडून टाकला आहे. या चार ट्रान्सफॉर्मरवर इतर 70 ते 75 थकबकीदार शेतक-यांच्या हलगर्जीपणामुळे गुलाब उप्तादक 13 शेतकरी कुटुंबांचे मोठे नुकसान होत आहे, तरीही महावितरण मात्र सर्वांची वसुली झाल्याशिवाय वीजपूरवठा सुरू न करण्यावर ठाम असल्याने गुलाब उत्पादक सर्व कुटुंबे हवालदील झाली आहेत.

जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथील विठ्ठल उमाप, रेवण फणसे, शरद उमाप, विक्रम उमाप, गणेश उमाप, श्रीकांत वाघचौरे, आकाश वाघचौरे आदींसह एकुण 13 शेतक-यांनी साधारण 10 ते 20 गुंठ्यांचे असे सुमारे एकुण चार एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रातील पॉलिहाऊसमध्ये  व्हॅलेंटाईन डे ची संधी साधून त्याआधी 45 दिवस गुलाब कटींग 20 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान करुन घेतली.

या काळात दररोज पाणी, प्रवाही खते आणि फवारणी हे सर्व या पिकासाठी बंधनकारक असते. मात्र जातेगावातील गवळीबा ट्रान्सफॉर्मर, काळूबाई ट्रान्सफॉर्मर, जातेगाव बुद्रुक गावठाण ट्रान्सफॉर्मर व जातेगाव खुर्द ट्रान्सफॉर्मर या नावाच्या ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरठाच चार दिवसांपूर्वी महावितरणने वीजबील थकीत असल्याचे कारण सांगून बंद केला.

पर्यायाने वरील 13 शेतक-यांच्या पॉलिहाऊसचा पाणी व प्रवाही खतेपूरवठाच बंद झाल्याने पॉलिहाऊसमधील गुलाब पिक पूर्ण कोमेजले आहे. पर्यायाने अगदी महिनाभरात हातातोंडाशी आलेली चांगली उत्पन्नाची संधी घालवून सुमारे सर्व शेतकरी मिळून सुमारे 40 ते 50 लाखांचा फटका शेतकरी कुटुंबांना बसणार आहे. याबाबत ३० (जानेवारी) तारखेपर्यंत काही शेतकरी थकीत बील भरायला तयार असतानाही महावितरणकडून संपूर्ण व सर्व शेतक-यांचे बील भरले गेल्याशिवाय वीजजोड पुर्ववत करणार नसल्याचे सांगितले जात असल्याने वरील सर्व गुलाब उप्तादक आणखीनच हतबल झालेले आहेत.

वरील चारही ठिकाणी एक गाव एक दिवस ही योजना मी स्वत:हून चालू करुन घेतलेली आहे. या शिवाय येथील उघड्या तारा काढून एरियल बंच प्रकारच्या सुरक्षित केबल येथे महावितरणने मोठा खर्च करुन टाकलेल्या आहेत. वीज चोरीच्या बाबतीत आम्ही गंभीर असून वरील चारही ट्रान्सफॉर्मर तात्काळ सुरू करीत आहोत. -नितीन महाजन, उपकार्यकारी अभियंता, महावितरण (शिक्रापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.