मंचर - कळमोडी धरणाचे पाणी सातगाव पठार (ता आंबेगाव) या भागातील शेतीला मिळाले पाहिजे. ३७० शेतकऱ्यांचे ३३५ हेक्टर श्रेत्र सातबारा- उतारावरील शिक्के त्वरित काढावेत व हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणातून काढण्यात येणारया बोगदाला विरोध असून, सदर बोगदा ना मंजूर करावा या मागणीसाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते देवीदास दत्तात्रय दरेकर व रवींद्र तुकाराम तोत्रे यांच्या नेतुत्वाखाली सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.२६) मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे.
उपोषणात विजय राम घोडेकर, दिलीप महादू चासकर, सुबोध सिताराम आवटे, संजय ज्ञानेश्वर तोडकर, सूर्यकांत किसन ढमाले, यशवंत झुरंगे, श्याम गुंजाळ, राजेंद्र शेवाळे, श्याम शेवाळे, अनिकेत शेवाळे, दिनेश आढळराव आदि शेतकरी सहभागी झाले आहेत. कळमोडी धरणाचे पाणी सातगाव पठार भागाला मिळालेच पाहिजे अश्या घोषणा या वेळी शेतकर्यांनी दिल्या.
'कुरवंडी, भावडी, कोल्हारवाडी, थुगाव, कारेगाव, श्रीरामनगर,पेठ, पारगाव तर्फे खेड (ता आंबेगाव) कडधे, कान्हेवाडी, फापळवाडी मिरजेवाडी, मोहकल, चास- कमान, वाफगाव, गुळाणी (ता, खेड) पाबळ, थिटेवाडी, परिसरातील गावे (ता. शिरूर) आदि गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कळमोडी धरणामुळे सुटणार आहे. पण धरणाचे पाणी मिळण्यासाठी कार्यवाही होत नाही.' असे शेतकर्यांनी संतप्त पणे सांगितले.
देविदास दरेकर म्हणाले, 'कळमोडी धरणाची निर्मिती सातगाव पठार, खेड व शिरूर तालुक्यातील काही गावांसाठी झाली आहे. १२ वर्षापूर्वी धरण झाले आहे. सातगाव पठार भागातील अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारा उतार्यावर पुनर्वसन खात्याचे शिक्के आहेत. त्यामुळे शेतकर्यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही.खाते फोड होत नाही. खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. शेतीला धरणाचे पाणीही मिळत नाही अश्या दुहेरी संकटात येथील शेतकरी राजा गेली अनेक वर्ष संघर्ष करत आहे. पण अश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नाही त्यामुळे या भागातील शेतकर्यात प्रचंड नाराजी आहे.
'कळमोडीचे पाणी सातगाव पठार भागाला देण्यास टाळाटाळ केल्यास व डिंभे धरणातून बोगद्यद्वारे नगर जिल्ह्यात पाणी पळविण्याचा प्रयत्न झाल्यास कळमोडी किवा डिंभे धरणात आम्हाला जल-समाधी घेतल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार तातडीने करावा.'
- देवीदास दत्तात्रय दरेकर, माजी गट नेते शिवसेना जिल्हा परिषद पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.