Pune : शेतकरी संजय माताळे यांचा गोऱ्हे खुर्द येथे सन्मान; राष्ट्रपती पुरस्कार देण्याची मागणी

खडकवासला धरणात बुडणाऱ्या चार मुली व एका महिलेला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचवून जीवदान
Farmer Sanjay Matale Honored Gorhe Khurd Demand for President Award pune
Farmer Sanjay Matale Honored Gorhe Khurd Demand for President Award punesakal
Updated on

सिंहगड : खडकवासला धरणात बुडणाऱ्या चार मुली व एका महिलेला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचवून जीवदान देणारे शेतकरी संजय सिताराम माताळे यांचा गोऱ्हे खुर्दसह परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

गोऱ्हे खुर्द चे ग्रामदैवत असलेल्या झाळणदेवी मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थितांनी संजय माताळे यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती जीवन रक्षा पुरस्कार मिळावा अशी भावना व्यक्त केली.

गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत परगावहून घरगुती कार्यक्रमासाठी आलेल्या महिला व मुलींपैकी सहा मुली व एक महिला सोमवारी (दि 15) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेल्या होत्या. दोन मुली पाण्याच्या कडेला बसल्या होत्या.

पाणी खोल असल्याने सातही जणी काही कळण्याच्या आत पाण्यात बुडाल्या. किनाऱ्यावर असलेल्या दोघींचा आरडाओरडा ऐकून सावडण्याच्या विधीसाठी आलेले शेतकरी संजय माताळे धावत आले व त्यांनी पाण्यात उडी घेऊन चार मुली व एका महिलेला बाहेर काढले.

Farmer Sanjay Matale Honored Gorhe Khurd Demand for President Award pune
Mahesh Landge यांच्या Pune विभाजनाच्या मागणीवर Chandrakant Patil यांची मिश्कील टिप्पणी

संजय माताळे यांनी पाण्याबाहेर काढलेल्या पाचजणींना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. दुर्दैवाने दोन मुली खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. संजय माताळे यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचा व त्यांना साथ देणाऱ्या राजेंद्र जोरी,

कालिदास माताळे, शिवाजी माताळे व रमेश भामे यांचा गोऱ्हे खुर्द, खानापूर व डोणजे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी अनेकांनी संजय माताळे यांना रोख बक्षीसही दिले.

Farmer Sanjay Matale Honored Gorhe Khurd Demand for President Award pune
Khadakwasla Dam : खडकवासला कालव्यात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला

तसेच संजय माताळे यांना राष्ट्रपती जीवन रक्षा पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती किसन जोरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.