पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे विरुध्द आळेफाट्याला रास्ता रोको

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत जुन्नर, आंबेगाव, खेड , हवेली या तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या बागायती जमीनी यामध्ये जात आहेत.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे विरुध्द आळेफाट्याला रास्ता रोको
Updated on

आळेफाटा : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी (Pune nashik highspeed train) एक इंच जमीन सुध्दा देणार नाही, असा कडक इशारा पुणे जिल्हा रेल्वे कृती समीतीचे जिल्हाध्यक्ष निलेश भुजबळ यांणी आळेफाटा या ठिकाणी आयोजीत केलेल्या रास्ता रोको आंदोलनात दिला. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत जुन्नर (junnar), आंबेगाव (ambegaon), खेड(khed), हवेली (haveli) या तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या बागायती जमीनी यामध्ये जात असुन, याला विरोध करण्यासाठी पुणे जिल्हा रेल्वे कृती समितच्या वतीने आळेफाटा(ता.जुन्नर) या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Farmer say no land given pune nashik high speed railway)

रेल्वे कृती समीतीचे जिल्हाध्यक्ष भुजबळ यांणी सांगितले की, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व,हिवरे तर्फे नारायणगाव,वडगाव कांदळी, नगदवाडी, भटकळवाडी, आळे, कोळवाडी,संतवाडी या गावातून पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे जात असुन, महारेल ने मोजणीची प्रक्रिया कुठलीही माहिती न देता मोजणी सुरू केली आहे. याबाबत शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला किती याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. तसेच या रेल्वे ज्या ठिकाणाहुन जात आहे, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विहरी जात असून उर्वरित क्षेत्राला पाणीपुरवठा कुठून करायचा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपसा जलसिंचन योजनेच्या पाईपलाईन आहेत, याबाबत महारेलने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. अनेक प्रकल्पांना यापूर्वी आमच्या जमिनींचे संपादन झाले असल्याने रेल्वे प्रकल्पाला आम्ही जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका या वेळी व्यक्त केली.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे विरुध्द आळेफाट्याला रास्ता रोको
पुणे : तीक्ष्ण हत्याराने तरुणांचा खून; पाच जण ताब्यात

तर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अंबादास हांडे यांनी यावेळी सांगीतले की, जुन्नर तालुक्यात पाच धरणे असुन धरणामध्ये तसेच जे कालवे गेले आहेत त्यामध्ये शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणावर जमीनी गेल्या आहेत. त्यातच आता या रेल्वे प्रकल्पात जमीणी जात असल्याने शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तसेच तालुक्यात आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली जि.एम.आर.टी केंद्र असुन त्यांनी या रेल्वेला परवानगी दिली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे विरुध्द आळेफाट्याला रास्ता रोको
पुण्यातील 4 धरणांमध्ये मिळून 92 टक्के पाणी साठा

दरम्यान, ज्या शेतक-यांच्या जमीनी गेल्या आहेत त्या जमीनीचा शासनाने बाजारभावाच्या चारपट मोबदला व पंचवीस टक्के प्रोत्साहनपर भरपाई देणार असल्याचे जाहीर केले तरी आम्ही आमची जमीन देणार नाही व यासाठी पुणे तुरूंगात जाण्याची तयारी आम्हा शेतक-यांची आहे असे खेड पंचायत समीतीचे माजी सभापती पाटील बुवा गवारी यांनी सांगीतले. तसेच आज आयोजित केलेल्या रस्ता रोको आंदोलनास प्रांताधिकारी व तालुक्याचे तहसीलदार हे काही कामानिमित्ताने उपस्थित राहु शकले नाहीत ते उद्या (दि.३ रोजी )आळेफाटा या ठिकाणी शेतक-यांच्या भेट घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.