सोयामीलच्या आयातीतून 'कोलदांडा' !

सोयाबीनचे भाव गडगडणार
soyabean
soyabeansakal
Updated on

सोमेश्वरनगर : सध्या बहुतांश पिकांना समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. सोयाबीनबाबत मात्र खात्री होती. पण केंद्र सरकारने बारा लाख टन सोयामीलची आयात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि आयात सोयामील एकाच वेळी बाजारात पोचणार आहे. परिणामी सोयाबीनचे भाव गडगडणार हे स्पष्ट झाले असून ‘कालवणात मीठ कालवले’ अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अडीच लाख टनांचे सोयाबीनचे पशुखाद्य आयात करणार असल्याची वार्ता मिळताच बारामती बाजार समितीमध्ये सोयाबीनचा ६ ऑगस्टला प्रतिक्विंटल ८ हजार ८०० असणारा दर १३ ऑगस्टपर्यंत ७ हजार ५०० वर पोचला होता. आता तर केंद्र सरकारने तब्बल बारा लाख टन जीएम (जनुकीय बदल केलेले) सोयाबीनचा केक (तेल काढून उरलेला माल) आयात करण्याची परवानगी दिली आहे. पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य, माशांचे खाद्य तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. सोयाबीनच्या भाववाढीने ही खाद्यनिर्मिती न परवडणाऱ्या उद्योगांकडून आयातीची मागणी होत होती. त्यानुसार केलेली आयात शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

soyabean
कालठणमधून होणार हवाई वाहतूक

विदर्भ, मराठवाडा, खानदेशात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. तर पुणे, सातारा जिल्ह्यातही बाजरीइतकेच सोबायीन पेरले जात आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे. शेतकरी किरण शेंडकर, रोहिदास जगताप म्हणाले, तेलबियांची कमतरता पाहून सरकारच्याच आवाहनानुसार सोयाबीनकडे शेतकरी वळले.

पैसे चांगले मिळणार याची खात्री असतानाच सरकारने भाव पाडण्याचे काम केले आहे. चांगल्या कालवणात मीठ कशासाठी कालवले तेच कळेना.

soyabean
गणेशोत्सवासह सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत

बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप म्हणाले, ‘‘नुसती बातमी आली तरी हजाराने भाव खाली आले आहेत. एकीकडे तेलबिया लावण्यासाठी उत्तेजन द्यायचे आणि दुसरीकडे तेलबियांचे पीक काढले की आयात करून भाव पाडायचे. भाव वाढले तेव्हा व्यापारी माल घेतच होते. आयात नसती तरी पडेल त्या भावाने त्यांनी माल घेतलाच असता.’’

माल एकाच वेळी बाजारात

सरकारी परवाने मिळवून माल जहाजाद्वारे बाजारात पोचायला दोन महिने लागतील. पश्चिम महाराष्ट्रातील सोयाबीन महिनाभराने बाजारात येईल तर विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून दोन महिन्यांनी येईल. एकाच वेळी माल बाजारात येऊन भाव पडतील. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत घातक आहे. दोन महिने आधी हा निर्णय घेतला असता तर कमी फटका बसला असता. अमेरिका, अर्जेंटिना, युरोपीय देशांनी कोरोनाकाळात साठा केलेला आहे. त्यामुळे तो कमी करण्यासाठी हळूहळू सोयामिल पाठोपाठ मका वगैरे आयात सुरू होईल, अशी परखड टीका शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.