Motivation News : शेतकऱ्याची मुलगी झाली पोलिस

राजुरी (ता. जुन्नर) येथील तृप्ती हाडवळे हिची मीरा-भाईंदर या ठिकाणी पोलिस दलात निवड झाली आहे.
trupti hadwale
trupti hadwalesakal
Updated on

आळेफाटा - राजुरी (ता. जुन्नर) येथील तृप्ती हाडवळे हिची मीरा-भाईंदर या ठिकाणी पोलिस दलात निवड झाली आहे. तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले शेतकरी वडील बाळासाहेब बोल्हू हाडवळे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

तृप्तीचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गावातच झाले आहे. तर पुढील शिक्षण आळे येथील ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालयातून झाले. पुढे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तिला हे यश मिळाले आहे. तिला यासाठी उत्तम गोरडे, आशिष सुपेकर, आदेश हाडवळे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

‘मुलीने पोलिस व्हावे ही माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असताना कष्ट करून यश मिळविले आहे. महाविद्यालयातील शिक्षक तसेच भाग्यविधाता ॲकॅडमीमधील शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. पोलिस व्हायचेच ही जिद्द ठेवली आणि पोलिस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले’, असे तृप्ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.